पुढील आठवडा उन्हाचा पारा चढाच राहणार : हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 03:17 PM2024-04-26T15:17:34+5:302024-04-26T15:18:35+5:30

राज्यात तापमानाचा पारा हा ३५ अंश सेल्सियसवर जात आहे. सकाळी ९ वाजल्यापासून उन्हाचे चटके सुरु हाेतात ते सायं ५ पर्यंत असतात.

Next week, summer temperatures will remain high: Meteorological Department forecast in goa | पुढील आठवडा उन्हाचा पारा चढाच राहणार : हवामान खात्याचा अंदाज

पुढील आठवडा उन्हाचा पारा चढाच राहणार : हवामान खात्याचा अंदाज

नारायण गावस

पणजी: राज्यात तापमानाचा पारा हा गेले पंधरा दिवस ३४ ते ३५ अंश सेल्सियस असून पुढील आठवडाभर हे तापमान असेत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे लाेकांनी घरातून बाहेर सरताना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने तसेच आरोग्य खात्याने केले आहे. 

राज्यात तापमानाचा पारा हा ३५ अंश सेल्सियसवर जात आहे. सकाळी ९ वाजल्यापासून उन्हाचे चटके सुरु हाेतात ते सायं ५ पर्यंत असतात. दुपारी १२ ते ३ पर्यंत तापमानाचा पारा हा ३५ अंशावर जात असतो. हे तापमान आणखी काही दिवस असेच राहणार आहे. त्यामुळे पावसाची शक्यता सध्या हवामान खात्याने वर्तविलेली नाही. गेल्या आठवड्यात राज्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस पडला पण आता हवामान स्वच्छ झाले आहे.  ढगाळ वातावरण नसल्याने सध्या लवकर पावसाची शक्यता नाही त्यामुळे  मे महिन्याचा १५ तारीख पर्यंत राज्यातील तापमान असेच वाढलेले राहणार आहे.

आराेग्यावर परिणाम

राज्यात वाढत्या तापमानाचे आरोग्यावर परिणाम जाणवणार आहे. लोकांना चक्कर येणे उल्टी होणे तसेच डोके दुखीचा त्रास होत आहे. उन्हाच्या चटक्यामुळे हृदयविकाराचे चटकेही काही जणांना येत आहेत. या उन्हामुळे पचनक्रियेस परिणाम होत आहे आरोग्यावर अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे बहुतांश लाेक सध्या हलक्या आहाराचे सेवन करत आहेत. डॉक्टरांकडून या उन्हाच्या दिवसात हलका आहार घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Next week, summer temperatures will remain high: Meteorological Department forecast in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.