म्हादईप्रश्नी गोवा सरकारडून डॅमेज कंट्रोल सुरू, पत्र बॅकफायर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 11:50 AM2017-12-28T11:50:12+5:302017-12-28T11:50:21+5:30

म्हादई नदीचे पाणी पिण्यासाठी कर्नाटकला देण्यास आम्ही तत्वत: तयार आहोत, अशा प्रकारचे विधान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रथम करून मग लगेच भाजपाचे कर्नाटकमधील नेते येडीयुरप्पा यांना आम्ही पाणी वाटपाविषयीच्या मागणीवर चर्चेस तयार आहोत, असे पत्रद्वारे कळविल्यानंतर गोव्यात आणि कर्नाटकमध्येही ती पत्र स्ट्रॅटेजी भाजपावर बॅकफायर झाली.

Mhadei questioned the launch of Damage Control by Goa Government, letter backfire | म्हादईप्रश्नी गोवा सरकारडून डॅमेज कंट्रोल सुरू, पत्र बॅकफायर

म्हादईप्रश्नी गोवा सरकारडून डॅमेज कंट्रोल सुरू, पत्र बॅकफायर

Next

पणजी : म्हादई नदीचे पाणी पिण्यासाठी कर्नाटकला देण्यास आम्ही तत्वत: तयार आहोत, अशा प्रकारचे विधान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रथम करून मग लगेच भाजपाचे कर्नाटकमधील नेते येडीयुरप्पा यांना आम्ही पाणी वाटपाविषयीच्या मागणीवर चर्चेस तयार आहोत, असे पत्रद्वारे कळविल्यानंतर गोव्यात आणि कर्नाटकमध्येही ती पत्र स्ट्रॅटेजी भाजपावर बॅकफायर झाली. यामुळे गोवा सरकारने सध्या म्हादईप्रश्नी सारवासारव चालविली असल्याचे आढळून येत आहे. गोमंतकीय जनतेचा मूड पाहून गोवा सरकारने डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे.

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला देणो आम्हाला तत्त्वत: मान्य आहे, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर गेल्या आठवडय़ात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्याचदिवशी पर्रीकरांनी पणजीहून कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष येडीयुरप्पा यांना पत्र फॅक्स केले व चर्चेसाठी तयार आहोत असे कळविले. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रामुळे गोव्यात प्रचंड खळबळ माजली. विरोधी काँग्रेस पक्षाने या विषयाचे भांडवल करण्यास आरंभ केलाच, शिवाय म्हादई बचाव अभियान, गोवा सुरक्षा मंच, शिवसेना, सेव्ह म्हादई- सेव्ह गोवा अशा एनजीओ आणि काही राजकीय पक्षांनीही र्पीकर सरकारविरुद्ध टीकेचे सत्र आरंभिले. पणजी व डिचोली शहरांमध्ये म्हादईप्रश्नी गोवा सरकारविरुद्ध निदर्शनेही झाली. एरव्ही कोणत्याही विषयावर पत्रकार परिषद घेणारा प्रदेश भाजप यावेळी गप्प राहिला. कारण म्हादई नदीचे पाणी देणार नाही असे म्हटले तर कर्नाटकमधील भाजप नेते दुखावतील आणि पाणी देणार असे म्हटले तर गोमंतकीयांमधील सरकारप्रतीचा रोष वाढत जाईल याची कल्पना भाजपला आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी गोवा सरकारने कर्नाटकमधील निवडणुकांनंतर चर्चा करू, असे म्हटले असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री र्पीकर यांनीही आपण कर्नाटकमधील निवडणुकीनंतर चर्चेस तयार आहोत असे म्हटले असल्याचे सांगण्यास आरंभ केला. चर्चेस तयार आहोत असे सांगितले म्हणजे पाणी दिले असा अर्थ होत नाही, असे पर्रीकर आता सांगू लागले आहेत.

म्हादईप्रश्नी गोव्यातील जनतेत निर्माण झालेल्या रोषाची धग सध्या भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील गोवा फॉरवर्ड व मगो पक्षालाही जाणवू लागली आहे. यामुळेच मगोपने सध्या कर्नाटकशी चर्चा न करता जैसे थे स्थिती ठेवावी, अशी मागणी जाहीरपणे आता केली आहे. गोवा फॉरवर्डचे आमदार असलेले विनोद पालयेकर हे जलसंसाधन मंत्री आहेत. त्यांनी तर मुख्यमंत्र्यांच्या पत्रविषयी आपल्याला काही ठाऊक नसल्याचे सांगितले व म्हादई नदीतील एक थेंब देखील पाणी कर्नाटकला देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. म्हादईप्रश्नी विद्यमान सरकारने तडजोड केली नसून ती तडजोड गोव्यात काँग्रेस सरकारच्या काळात केली गेली होती, असा दावा अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी केला आहे. अगोदर कर्नाटकने म्हादई नदीवर धरणांचे बांधकाम करण्याची योजना सोडून द्यावी, मग गोवा सरकारशी चर्चा सुरू करता येईल असे नाडकर्णी यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: Mhadei questioned the launch of Damage Control by Goa Government, letter backfire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.