म्हादईचा तिढा वाढला, उत्तर कर्नाटकात उद्या बंद, गोवा सरकार संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 11:35 PM2017-12-26T23:35:38+5:302017-12-26T23:35:59+5:30

म्हादई पाणीप्रश्नी सध्या गोवा व कर्नाटक या दोन राज्यांमधील तिढा आणखी वाढला आहे. उत्तर कर्नाटकमधील शेतक-यांनी म्हादईचे पाणी वळवून ते मलप्रभेत सोडावे व त्याचा पुरवठा शेतक-यांसाठी केला जावा म्हणून आंदोलन चालवले आहे.

Mhadai's horror, close to tomorrow in North Karnataka, Goa government confused | म्हादईचा तिढा वाढला, उत्तर कर्नाटकात उद्या बंद, गोवा सरकार संभ्रमात

म्हादईचा तिढा वाढला, उत्तर कर्नाटकात उद्या बंद, गोवा सरकार संभ्रमात

Next

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी सध्या गोवा व कर्नाटक या दोन राज्यांमधील तिढा आणखी वाढला आहे. उत्तर कर्नाटकमधील शेतक-यांनी म्हादईचे पाणी वळवून ते मलप्रभेत सोडावे व त्याचा पुरवठा शेतक-यांसाठी केला जावा म्हणून आंदोलन चालवले आहे. आज उत्तर कर्नाटकामध्ये बंद पाळला जाणार आहे. त्यामुळे गोव्याहून धारवाडच्या भागात कदंब बसगाडय़ा आज सोडल्या जाणार नाहीत. तथापि, म्हादई पाणीप्रश्नी गोमंतकीयांच्या भावना संतप्त असल्याने गोवा सरकार सध्या संभ्रमात सापडले आहे.
भाजपचे कर्नाटकमधील नेते येडीयुरप्पा यांनी उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील शेतक-यांना म्हादईचे पाणी मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. दि. 15 डिसेंबर्पयत आपण म्हादईचे पाणी मिळवून देईन, असे येडीयुरप्पा यांनी म्हटले होते. मात्र ते आश्वासन पूर्ण करू शकले नाही. यामुळे शेतकरी संतप्त बनले असून त्यांनी बंगळुरला भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन चालवले आहे. येडीयुरप्पा यांना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्र लिहिले व पिण्यासाठी म्हादईचे पाणी द्यावे या मागणीबाबत चर्चा करण्याची तयारी दाखवली. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्याला पत्र लिहावे, अशी भूमिका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी म्हादईपाणी प्रश्नी जी काही चर्चा होईल ती कर्नाटकमधील निवडणुकीनंतरच असे यापूर्वी जाहीर केले आहे. कर्नाटकमध्ये सध्या म्हादईचा वाद पेटला असून गोव्यातही सरकारच्या पत्रामुळे म्हादईच्या विषयाचे अभ्यासक, संशोधक, पर्यावरणप्रेमींसह उत्तर गोव्यातील अनेक लोकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. गोव्यात नाताळ सण साजरा होत असताना म्हादईप्रश्नी जी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, त्यास पर्रीकर यांनी कर्नाटकला दिलेले पत्र कारणीभूत ठरते, असे आम आदमी पक्षाने मंगळवारी म्हटले आहे. म्हादई नदीचे पाणी मिळावे म्हणून उत्तर कर्नाटकमध्ये आज बंद पुकारला गेल्याने त्या भागात गोव्यातील कदंब बसेस जाऊ शकणार नाहीत. 

बैठकीची कल्पना नाही- पर्रीकर 
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी येत्या 5 रोजी येडीयुरप्पा संपर्क साधतील व म्हादईप्रश्नी बैठक घेतील, अशा प्रकारची चर्चा पसरली आहे. याविषयी लोकमतने मुख्यमंत्री पर्रीकर यांना मंगळवारी विचारले असता, ती अफवा असल्याचे ते म्हणाले. आपल्याला तरी कोणत्याच प्रकारच्या बैठकीची कल्पना नाही, असे पर्रीकर यांनी सांगून वृत्त फेटाळले. पर्रीकर मंगळवारी गुजरातला गेले होते. ते रात्री परतले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे म्हादईप्रश्नी येडीयुरप्पा यांच्या सातत्याने संपर्कात आहेत अशी चर्चा राष्ट्रीय स्तरांवरून येणा-या वृत्तांमधून सद्या पसरत आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नायक यांनी पर्रीकर यांच्या पत्रावर मंगळवारी टीका केली आहे. दोन राज्यांमधील लोकांमध्ये शत्रूत्वाची भावना पर्रीकर यांच्या पत्रामुळे वाढली आहे. नाताळ सणावेळी तरी अशी कडवट स्थिती नको होती. पर्रीकर यांनी म्हादईप्रश्नी केवळ राजकीय हेतूपोटी येडीयुरप्पा यांना पत्र देणो हा मोठा बेजबाबदारपणा आहे, असे आपने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Mhadai's horror, close to tomorrow in North Karnataka, Goa government confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा