कर्नाटकला पाणी देणार नाही,  म्हादई प्रश्नी गोवा फॉरवर्डची ताठर भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 06:27 PM2018-01-24T18:27:45+5:302018-01-24T18:28:11+5:30

पर्रिकर सरकारमध्ये घटक असलेल्या गोवा फॉरवर्डने जॅक सिक्वेरांच्या पुतळ्यासंबंधीच्या विषयानंतर आता म्हादईबाबतही ताठर भूमिका घेतली आहे. कोणावर राजकीय दबाव असेल तर तो त्यांचा प्रश्न, असे नमूद करीत भाजपला चपराक दिली असून कर्नाटकला पाणी मुळीच देणार नाही, असे बजावले आहे.

 The hard role of Goa forward for the Mhadai question, Karnataka will not give water to Karnataka | कर्नाटकला पाणी देणार नाही,  म्हादई प्रश्नी गोवा फॉरवर्डची ताठर भूमिका 

कर्नाटकला पाणी देणार नाही,  म्हादई प्रश्नी गोवा फॉरवर्डची ताठर भूमिका 

Next

पणजी - पर्रिकर सरकारमध्ये घटक असलेल्या गोवा फॉरवर्डने जॅक सिक्वेरांच्या पुतळ्यासंबंधीच्या विषयानंतर आता म्हादईबाबतही ताठर भूमिका घेतली आहे. कोणावर राजकीय दबाव असेल तर तो त्यांचा प्रश्न, असे नमूद करीत भाजपला चपराक दिली असून कर्नाटकला पाणी मुळीच देणार नाही, असे बजावले आहे. गोव्याचे नैसर्गिक स्रोत हे कोणाची वैयक्तिक मालमत्ता नसल्याचेही सुनावले आहे. 

पत्रकार परिषदेत मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी मंगळवारी रात्री झालेल्या पक्षाच्या संसदीय व्यवहार समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. जलस्रोतमंत्री विनोद पालयेंकर यांनी म्हादईचे पाणी कर्नाटकला न देण्याबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट केल्यानंतर बैठकीत पक्षाच्या सर्व नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. म्हादईच्या बाबतीत कोणतीही तडजोड न स्वीकारण्याचा निर्णय याप्रसंगी झाला. पक्षाचे अध्यक्ष तथा नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. गृहनिर्माणमंत्री जयेश साळगांवकर, बाबुश मोन्सेरात तसेच पक्षाचे अन्य नेतेही बैठकीला उपस्थित होते. संघटनात्मक विषय तसेच राजकीय प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली. 

पक्षाचे काम अपेक्षेप्रमाणे पुढे जात नसल्याचे मत बनल्याने काही बदल करण्याचे ठरले त्यानुसार जलस्रोतमंत्र्यांनी त्यांचे ओएसडी दुर्गादास कामत तसेच नगरनियोजनमंत्र्यांनी त्यांचे ओएसडी दिलीप प्रभुदेसाई यांना या पदांवरुन मुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला आणि बैठकीत सर्वांनी त्याचे समर्थन केले. या दोघांकडेही पक्षकार्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. 

  मायकल लोबोंकडे हातमिळवणी?

जॅक सिक्वेरांच्या पुतळ्याचा विषयही चर्चेला आला. उपसभापती मायकल लोबो पुतळ्याच्या मागणीचा खाजगी ठराव विधानसभेत आणतील त्याला गोवा फॉरवर्डचे तिन्ही विधिमंडळ सदस्य पाठिंबा देतील. शिवाय गोवा फॉरवर्डचे हे तिन्ही मंत्री सर्व पक्षांच्या ३६ आमदारांची भेट घेऊन त्यांना पुतळ्याचा मुद्दा पटवून देतील. जॅक सिक्वेरांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारला जावा ही मागणी कायम असल्याचे डिमेलो यांनी सांगितले. गोवा फॉरवर्डचे तीनही आमदार मंत्री असल्याने खाजगी ठराव आणू शकत नाहीत. त्यामुळे लोबोंनी ठराव आणल्यानंतर त्यास तिन्ही मंत्री पाठिंबा देतील, असे ते म्हणाले. विधानसभेत ठरावाच्यावेळी प्रत्येकाची भूमिका स्पष्ट होईल. त्यानंतर गोवा फॉरवर्ड पुढील निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. 

जॅक सिक्वेरांच्या पुतळ्याबाबत विधानसभेत ठराव झालेला नाही, असे म्हणणाºयांनी गोव्याच्या अस्मितेबद्दल तळमळ असती तर म्हादईबाबत आजवर ठराव का आणला नाही, असा सवाल डिमेलो यांनी केला. 

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांनी गोवा फॉरवर्डने सरकारचा पाठिंबा काढावा, असे जे आवाहन केले आहे त्याचाही डिमेलो यांनी समाचार घेतला. गिरीश यांनी आम्हाला सल्ले द्यायची गरज नाही. घरात आपापासात काही मतभेद असतील तर ते आम्ही बघून घेऊ, असे त्यांनी सुनावले. विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्डकडे युती केली नाही म्हणून बहुधा चोडणकर यांना पश्चाताप होत असावा त्यातूनच ते असे आरोप करीत असावेत, अशी टीका डिमेलो यांनी केली. 

Web Title:  The hard role of Goa forward for the Mhadai question, Karnataka will not give water to Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.