गोवा शिपयार्डने परदेशातसुद्धा व्यवसाय वाढवण्याकरिता पुढाकार घ्यावा - निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 05:03 PM2019-02-21T17:03:25+5:302019-02-21T17:07:06+5:30

गोवा शिपयार्डकडून बांधण्यात येणाऱ्या जहाजांचा दर्जा उत्कृष्ठ असल्याची जाणीव अनेक विदेशी देशांना सुद्धा असून, यामुळेच यापूर्वी श्रीलंका, मॉरिशस सारख्या राष्ट्रांनी आपल्या सशस्त्र दलासाठी त्यांच्याकडून जहाजे घेतलेली आहेत.

Goa Shipyard should also take the initiative to increase business abroad - Nirmala Sitharaman | गोवा शिपयार्डने परदेशातसुद्धा व्यवसाय वाढवण्याकरिता पुढाकार घ्यावा - निर्मला सीतारामन

गोवा शिपयार्डने परदेशातसुद्धा व्यवसाय वाढवण्याकरिता पुढाकार घ्यावा - निर्मला सीतारामन

Next
ठळक मुद्देगोवा शिपयार्डकडून बांधण्यात येणाऱ्या जहाजांचा दर्जा उत्कृष्ठ असल्याची जाणीव अनेक विदेशी देशांना सुद्धा असून, यामुळेच यापूर्वी श्रीलंका, मॉरिशससारख्या राष्ट्रांनी आपल्या सशस्त्र दलासाठी त्यांच्याकडून जहाजे घेतलेली आहेत.भारतीय तटरक्षक दलासाठी पाच अत्याधुनिक जहाजे बांधण्याचा प्रकल्प गोवा शिपयार्डला देण्यात आलेला असून, यापैंकी पहिल्या जहाजाच्या जलावतरण समारंभाला गुरुवारी (दि.२१) संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या

वास्को - जहाज बांधणी क्षेत्रात गोवा शिपयार्ड ने प्रत्येक वेळी भरारीची कामगीरी केलेली असून यामुळेच भारतीय संरक्षण विभाग गोवा शिपयार्डला मोठ्या प्रमाणात वेळोवेळी जहाज बांधण्याचे प्रकल्प देतात. गोवा शिपयार्डकडून बांधण्यात येणाऱ्या जहाजांचा दर्जा उत्कृष्ठ असल्याची जाणीव अनेक विदेशी देशांना सुद्धा असून, यामुळेच यापूर्वी श्रीलंका, मॉरिशस सारख्या राष्ट्रांनी आपल्या सशस्त्र दलासाठी त्यांच्याकडून जहाजे घेतलेली आहेत. गोवा शिपयार्डने याचाच फायदा उठवित त्यांचा व्यपार विदेशात सुद्धा पसरवण्यासाठी येणा-या काळात पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री श्रीमती. निर्मला सीतारामन यांनी केले.

भारतीय तटरक्षक दलासाठी पाच अत्याधुनिक जहाजे बांधण्याचा प्रकल्प गोवा शिपयार्डला देण्यात आलेला असून, यापैंकी पहिल्या जहाजाच्या जलावतरण समारंभाला गुरुवारी (दि.२१) संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्याबरोबर राज्य आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख संचालक राजेंद्र सिंग, अतिरिक्त संचालक के. नटराजन, गोवा शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक बी.बी. नागपाल, तटरक्षक दलाचे निरीक्षक प्रमुख मनोज बाडकर, गोवा तटरक्षक दलाच्या विभागाचे प्रमुख फिलीपोनीस पायनमुट्टल व इतर मान्यवर उपस्थित होते. जलावतरण समारंभाच्या वेळी ह्या जहाजाचे नामस्करण करण्यात आले असून या जहाजाचे नाव ‘आयसीजी सचेत’ असणार असल्याचे संरक्षणमंत्री सीतारामन यांनी यावेळी घोषीत केले. याप्रसंगी बोलताना सीतारामन यांनी आजचा दिवस एतिहासिक दिवस असल्याचे सांगून लढाऊ जहाज बांधणीच्या क्षेत्रात गोवा शिपयार्ड खरोखरच उत्तम कामगीरी करत असल्याचे सांगितले. यापूर्वी गोवा शिपयार्डला तटरक्षक दलाकरीता पाच जहाजे बांधण्याचा प्रकल्प देण्यात आल्यानंतर हे काम उत्कृष्ठ व अत्याधुनिक पद्धतीने वेळेवर पूर्ण करून दिल्याने त्यांना पुन्हा आणखीन पाच जहाजे बांधण्याचे काम देण्यात आल्याची माहीती सीतारामन यांनी दिली. ह्या प्रकल्पातील आज पहील्या जहाजाचे जलावतरण होत असून गोवा शिपयार्ड यावेळी सुद्धा प्रत्येक वेळासारखीच भविष्यातही अभूतपूर्व कामगीरी करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोवा शिपयार्डकडून करण्यात येत असलेल्या अभूतपूर्व अशा कामाची जाणीव भारतीय संरक्षण विभागाला असल्यानेच त्यांना पुन्हा पुन्हा विविध जहाज बांधणीचे प्रकल्प देण्यात येत असून याकारणामुळेच त्यांना भविष्यात नौदलासाठी दोन अत्याधुनिक ‘मिसाईल्स फ्रीग्रेट’ जहाज बांधण्याचाही प्रकल्प देण्यात आलेले असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

२०१४ सालापासून अजून तटरक्षक दलाच्या ताफ्यात ६४ जहाजे आलेली असून यापैंकी ७५ टक्के जहाजे गोवा शिपयार्डने बांधलेली असून यावरूनच संरक्षण दलाचा गोवा शिपयार्डवर असलेला पूर्ण विश्वास दिसून येतो. भारताबरोबरच गोवा शिपयार्डकडून बांधण्यात येणाºया उत्कृष्ठ जहाजाबाबत विदेशी देशांना सुद्धा जाणीव असल्याने काही विदेशी देशांने सुद्धा गोवा शिपयार्डकडून जहाजे बांधून घेतलेली असून यात २ श्रीलंका नौदलातील ‘ओफ शोर पेट्रोल’ जहाजांचा समावेश असून मोरेशीयस तटरक्षक दलात १३ जहाजांचा समावेश असल्याची माहीती सीतारामन यांनी दिली. गोवा शिपयार्डकडून जहाजबांधणीत करण्यात येणा-या उत्कृष्ट कामगीरीची प्रशंसा विदेशात सुद्धा होत असून याचा फायदा त्यांनी उठवण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. भारतातील संरक्षण विभागांना जहाज बांधून देण्यापूर्तेच मर्यादीत न राहता गोवा शिपयार्डने विदेशी बाजारात सुद्धा आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मोठा पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भारतातील खासगी व सार्वजनिक व्यवस्थापनांनी आपला व्यवसाय विदेशात सुद्धा वाढवावा असे स्वप्न असून गोवा शिपयार्ड यात नक्कीच यशस्वी होऊन जहाज बांधणी क्षेत्रात विदेशातही आपले नाव उंचवणार असा विश्वास त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला. याप्रसंगी भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख संचालक राजेंद्र सिंग यांनी गोवा शिपयार्ड कडून जहाज बांधणीच्या क्षेत्रात करण्यात येत असलेल्या उत्कृष्ठ कामगिरीची प्रशंसा केली. मागील काही वर्षात तटरक्षक दलाचे बळ वाढवण्यासाठी संरक्षण विभागाने भरारीचा पुढाकार घेतलेला असून सध्या तटरक्षक दलाच्या ताफ्यात १३८ जहाजे व ६२ एअरक्राफ्ट असल्याची माहीती त्यांनी दिली. तटरक्षक दलाने देशाची सुरक्षा सांभाळण्यासाठी काम करण्याबरोबरच मागील काही वर्षात एकून ९५०० जणांचे समुद्रात प्राण बचाविलेले असल्याचे माहीतीत शेवटी बोलताना सांगितले. गोवा शिपयार्डचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक बी बी नागपाल यांनी आपल्या स्वागतपर भाषणात आमच्या कामगार व अधिका-यांच्याच अथक प्रयत्नामुळे आम्ही विकास केलेले असल्याचे सांगून जहाज बांधणी क्षेत्रात आणखीन विकास करण्यासाठी गोवा शिपयार्ड सतत अचुक पावले उचलणार असे ते शेवटी बोलताना म्हणाले. आयसीजी सचेत ह्या जहाजाचे गुरवारी जलावतरतण झाल्यानंतर ह्या जहाजाचे राहीलेले काम सुमारे ८ महीन्यानंतर पूर्ण करून अनावरण केल्यानंतर जहाज देशसेवेत रूजू होणार आहे.

Web Title: Goa Shipyard should also take the initiative to increase business abroad - Nirmala Sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.