Goa: पर्यटन खात्याच्या प्रस्तावित प्रकल्पाला शिरदोणवासियांचा विरोध

By पूजा प्रभूगावकर | Published: April 24, 2024 01:28 PM2024-04-24T13:28:30+5:302024-04-24T13:28:43+5:30

Goa News: फिरगेभाट - शिरदोण येथील प्रस्तावित पर्यटन प्रकल्पाला शिरदोणवासियांनी बुधवारी विरोध करीत त्याविरोधात शिरदोण पंचायतीवर धडक दिली. मात्र या प्रकल्पा विषयी माहिती देण्यासाठी तेथे सरपंच उपस्थित नसल्याने लोक चांगलेच भडकले.

Goa: Residents of Shirdon oppose proposed project of tourism department | Goa: पर्यटन खात्याच्या प्रस्तावित प्रकल्पाला शिरदोणवासियांचा विरोध

Goa: पर्यटन खात्याच्या प्रस्तावित प्रकल्पाला शिरदोणवासियांचा विरोध

- पूजा नाईक प्रभूगावकर 
पणजी -  फिरगेभाट - शिरदोण येथील प्रस्तावित पर्यटन प्रकल्पाला शिरदोणवासियांनी बुधवारी विरोध करीत त्याविरोधात शिरदोण पंचायतीवर धडक दिली. मात्र या प्रकल्पा विषयी माहिती देण्यासाठी तेथे सरपंच उपस्थित नसल्याने लोक चांगलेच भडकले.

या प्रस्तावित पर्यटन प्रकल्पाबाबत आम्हाला विश्वासात घेतले नाही. गावच्या लोकांना कुठलीही कल्पना न देताच याठिकाणी संरक्षण भिंत उभारली आहे. प्रकल्पाला ना हरकत दाखला पंचायतीने देऊ नये. पर्यटन प्रकल्पाच्या नावाखाली गावचा ऱ्हास करु नये अशी मागणीही शिरदोणवासियांनी केली.

ग्रामस्थ सॅमी ग्रशिएस म्हणाले, की पर्यटन प्रकल्पाच्या नावाखाली शिरदोण येथील किनाऱ्या नजीक असलेली वाट अडवण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी संरक्षण भिंत उभारली असून गेट घातली जात आहे. पर्यटनाच्या नावाखाली गावची वाट लावू नये. पंचायतीने खरे तर या प्रकल्पाबाबत आम्हाला विश्वासात घेणे अपेक्षित होते. मात्र तसे काहीच केले नाही. . केवळ पर्यटन प्रकल्प इतकेच सांगितले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: Goa: Residents of Shirdon oppose proposed project of tourism department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.