गोवा: वेश्या व्यवसायातून मुंबईच्या युवतीची सुटका, एका महिलेसह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 18:58 IST2018-01-16T18:56:34+5:302018-01-16T18:58:58+5:30
सोमवारी रात्री वेश्या व्यवसायाविरोधात कारवाई, पोलिसांनी स्थानिक मोटरसायकल चालक संदीप बोरकर यालाही अटक केली आहे.

गोवा: वेश्या व्यवसायातून मुंबईच्या युवतीची सुटका, एका महिलेसह दोघांना अटक
मडगाव : मडगाव पोलिसांनी सोमवारी रात्री वेश्या व्यवसायाविरोधात केलेल्या कारवाईत फातिमा मुकादम उर्फ सपना या 37 वर्षीय मुंबईच्या दलाल महिलेला अटक करतानाच मूळ कोलकात्यातील पण सध्या मुंबईत वास्तव करुन रहाणा-या एका 28 वर्षीय महिलेची सुटका केली. या प्रकरणात मडगाव पोलिसांनी स्थानिक मोटरसायकल चालक संदीप बोरकर यालाही अटक केली आहे.
मडगाव रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या ईएसआय हॉस्पिटलजवळ एका ग्राहकाला पुरविण्यासाठी या युवतीला आणण्यात आले होते. पोलिसांना याची खबर मिळाल्यानंतर रात्री 12.45 वा. पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी ही कारवाई केली. या दलालाच्या हातातून सोडविलेल्या त्या युवतीची अपना घरमध्ये रवानगी केली असून आरोपीसंदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी मडगाव पोलिसांनी मुंब्रा पोलिसांशी संपर्क साधला आहे.