गोवा राजभवनला दिलासा, माहिती आयोगाच्या आदेशाला खंडपीठाची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 05:31 PM2018-11-22T17:31:06+5:302018-11-22T17:31:09+5:30

राजभवन माहिती हक्क खाली आणण्याच्या माहिती हक्क आयोगाच्या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने स्थगिती दिली आहे.

Goa Raj Bhawan relief, suspension of Bench directed by EC order | गोवा राजभवनला दिलासा, माहिती आयोगाच्या आदेशाला खंडपीठाची स्थगिती

गोवा राजभवनला दिलासा, माहिती आयोगाच्या आदेशाला खंडपीठाची स्थगिती

Next

पणजी: राजभवन माहिती हक्क खाली आणण्याच्या माहिती हक्क आयोगाच्या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने स्थगिती दिली आहे. राजभवनाने या संदर्भात आव्हान याचिका सादर केली होती. राजभवन म्हणजे राज्यपालांचे निवासस्थान ही सार्वजनिक अधिकारणी होत असल्यामुळे ती माहिती हक्काच्या कक्षेत येत असल्याचा महत्त्वपूर्ण निवाडा गोवा मुख्य माहिती आयुक्ताने १५ आॅक्टोबर रोजी दिला होता. त्यामुळे राजभवनातील माहिती माहिती हक्का अंतर्गत कुणालाही मिळविणे शक्य झाले होते.

राजभवन माहिती हक्काखाली येत नसल्याच्या राजभवनच्या स्पष्टीकरणानंतर अ‍ॅड. आयरिश रॉड्रिगीश यांनी गोवा मुख्य माहिती आयुक्ताकडे या संबंधी अाव्हान याचिका सादर केली होती. परंतु राजभवनाने माहिती आयोगाच्या या निवाड्याला खंडपीठात आव्हान दिल्यामुळे आव्हान याचिका दाखल करून घेण्यात आली होती. गुरूवारी हे प्रकरण खंडपीठासमोर सुनावणीसाठी आले असता याचिकादाराकडून अंतरीम स्थगितीची मागणी करण्यात आली. खंडपीठाने अंतरिम स्थगिती मंजूर करताना न्या. बदंग यांनी १० डिसेंबरपर्यंत माहिती आयोगाच्या निवाड्याला स्थगिती दिली. पुढील सुनावणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Web Title: Goa Raj Bhawan relief, suspension of Bench directed by EC order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.