‘जीसीईटी’चा निकाल जाहीर

By admin | Published: May 11, 2014 12:46 AM2014-05-11T00:46:49+5:302014-05-11T00:46:49+5:30

पणजी : तांत्रिक शिक्षण संचालनालयाने ६ व ७ मे रोजी घेतलेल्या जीसीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

GCET results | ‘जीसीईटी’चा निकाल जाहीर

‘जीसीईटी’चा निकाल जाहीर

Next

पणजी : तांत्रिक शिक्षण संचालनालयाने ६ व ७ मे रोजी घेतलेल्या जीसीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पदार्थविज्ञान विषयात हृषिकेश शेटगावकर, रसायनशास्त्रात क्रिस्पी मिशेल फर्नांडिस, गणितात सूरज शिरसाट, तर जीवशास्त्रात सिडनी पाल्हा यांनी पहिला क्रमांक पटकावला. ३४०३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते. परीक्षेत पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र या चार विषयांचा समावेश करण्यात आला होता. यंदा पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र व गणित या तीन विषयांच्या सरासरी गुणांमध्ये गतवर्षीच्या गुणांच्या तुलनेत घसरण झाली आहे, असे मत मुंबईस्थित आयआयटीचे सरव्यवस्थापक एस. एस. मेजर यांनी निकाल प्रसिद्ध करताना व्यक्त केले. या परीक्षेतील उत्तरपत्रिका ओआरएस (आॅब्जेक्टिव्ह रिस्पॉन्स शिट) या यांत्रिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केवळ दोन दिवसांत तपासण्यात आल्या. या प्रवेश परीक्षा चाचणीचे आयोजन व पेपर तपासणी आयआयटीच्या साहाय्याने करण्यात आली होती. चारही विषयांतून प्रत्येकी ७५ गुणांसाठी परीक्षा घेण्यात आली. पदार्थविज्ञान विषयात यंदा ५९ कमाल गुण आहेत. गतवर्षी ही संख्या ७१ होती. रसायनशास्त्रात यंदा ६९ कमाल गुण मिळाले. गतवर्षी ते ७३ होते. गणितात कमाल गुण गतवर्षी ७४ होते. यंदा ते ६९ असून जीवशास्त्रात यंदा ७१ कमाल गुण मिळाल्याची माहिती या वेळी देण्यात आली. यंदा ‘नीट’ प्रवेश परीक्षा रद्द केल्याने वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशांसाठी जीवशास्त्र या विषयाचा जीसीईटीत समावेश करण्यात आला होता. परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय, दंतचिकित्सा, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, बी. फार्म (फार्मसी), बी. आर्क (आर्किटेक्चर) या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी तांत्रिक शिक्षण संचालनालय-पर्वरी किं वा रवींद्र भवन-मडगाव येथे उपलब्ध असलेले अर्ज (फॉर्म-बी) दि. १५ मे ते २४ मे दरम्यान सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत (रविवार वगळता) भरावेत, असे आवाहन तांत्रिक शिक्षण संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, पणजी येथील आर्यन्स उच्च माध्यमिक विद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी जीसीईटी प्रवेश परीक्षेत विविध विषयांमधील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांच्या नामावलीत स्थान पटकावले आहे. हृषिकेश शेटगावकर, पुनित भट, क्रिस्पी मिशेल फर्नांडिस, पनाह परब, सूरज शिरसाट, अतुल शानभाग, राहुल द गामा, तनिष्क मेहेरा, सिडनी पाल्हा हे ते यशस्वी विद्यार्थी होत. (विद्यार्थी प्रतिनिधी)

Web Title: GCET results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.