वेर्णा येथील उड्डाण पुलावरील लोखंडी सांगाडा कोसळला, चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:32 PM2019-03-13T22:32:36+5:302019-03-13T22:32:52+5:30

उड्डाण पूलाचे काम चालू असताना दुपारी १२.३० वाजता हा सांगाडा भयंकर आवाज करीत खाली कोसळला.

Four iron rods collapsed in Verna, four injured | वेर्णा येथील उड्डाण पुलावरील लोखंडी सांगाडा कोसळला, चार जण जखमी

वेर्णा येथील उड्डाण पुलावरील लोखंडी सांगाडा कोसळला, चार जण जखमी

googlenewsNext

वास्को: दक्षिण गोव्यातील वेर्णा, सांत्रे भागात बांधण्यात येत असलेल्या नवीन उड्डाण पूलाच्या दोन खांब्यावर कमान चढवण्यासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा आज (दि. १३) दुपारी कोसळल्याने येथे कामाला असलेल्या एका क्षेत्र अभियंत्यासहित अन्य तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

या खांब्यावर कमान चढवण्यासाठी बांधलेला लोखंडी सांगाडा कोसळण्यामागचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसून वेर्णा पोलीस तसेच इतर संबंधित यंत्रणे याबाबत तपास करत असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. पणजी ते मडगाव अशा महामार्गावर उड्डाण पूल बांधण्याचे काम सध्या जोरात चालू आहे. झुआरी पूल झाल्यानंतर कुठ्ठाळीहून वेर्णाच्या दिशेने जात असताना वेर्णा, सांत्रे चढावावर उभारण्यात आलेल्या उड्डाण पूलाच्या दोन खांब्यावर कमान चढवण्यासाठी भला मोठा लोखंडी सांगाडा उभारला होता.

सदर उड्डाण पूलाचे काम चालू असताना दुपारी १२.३० वाजता हा सांगाडा भयंकर आवाज करीत खाली कोसळला. ही घटना घडल्याचे येथे असलेल्या इतर कामगारांना व कर्मचाऱ्यांना दिसून येताच त्यांनी सांगाड्याखाली सापडलेल्या कामगारांना व कर्मचाऱ्यांना त्वरित बाहेर काढण्याच्या कामाला सुरवात केली. तसेच घटनेची माहिती वेर्णा पोलीसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरवात केली. कोसळलेल्या सांगाड्याखाली चार जण अडकलेले असल्याचे दिसून येताच त्यांना त्वरित बाहेर काढून नंतर उपचारासाठी बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिले. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी वेर्णा पोलीस सुत्रांशी संपर्क केला असता सदर घटनेत उड्डाण पूलाचे काम करणा-या ‘दिलीप बिल्डकॉन’ कंपनीचे क्षेत्र अभियंता विकास कुमार (वय२८, मूळ: बिहार) यांच्यासहित अन्य तीन कंत्राणी कंपनीचे कामगार जखमी झालेले असल्याची माहिती दिली.

हा सांगाडा कोसळण्याचे कारण अजून स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी येथे उभ्या असलेल्या ‘क्रेन’ची कदाचित सांगाड्याला धडक बसून ही घटना घडली असावी असा संशय सध्या व्यक्त करण्यात येत आहे. सदर ठीकाणी उभा करून ठेवलेल्या एका ट्रकवर सांगाड्याचा मोठा भाग कोसळल्याने ह्या ट्रकची सुद्धा नुकसानी झाली आहे.

मुरगाव पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत व इतर पोलीस अधिकाऱ्यांसहित घटनास्थळावर जाऊन येथे घडलेल्या परिस्थितीची माहीती मिळवून घेतली. ही घटना कशी घडली याची माहिती जाणून घेण्यासाठी जखमी झालेल्या अभियंता व कामगारांची येणा-या काळात जबानी नोंद करण्यात येणार अशी माहीती पोलीस सुत्रांनी दिली. सदर प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.

Web Title: Four iron rods collapsed in Verna, four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा