आधार केंद्रात त्रुटी सुधारण्यासाठी नागरिकांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 02:31 PM2018-10-07T14:31:43+5:302018-10-07T14:32:30+5:30

हजारो लोक जन्मतारीख व मोबाइल क्रमांक आधार कार्डवर अद्यायवत करण्यासाठी राज्यातील आधार सुविधा केंद्रावर गर्दी करताना दिसत आहेत.

Citizens' rush in aadhar card center to Improve Error | आधार केंद्रात त्रुटी सुधारण्यासाठी नागरिकांच्या रांगा

आधार केंद्रात त्रुटी सुधारण्यासाठी नागरिकांच्या रांगा

Next

पणजी : हजारो लोक जन्मतारीख व मोबाइल क्रमांक आधार कार्डवर अद्यायवत करण्यासाठी राज्यातील आधार सुविधा केंद्रावर गर्दी करताना दिसत आहेत. सुरुवातीलाच तपशीलवर माहिती देऊनही कार्डवरील चुका सुधारण्यासाठी रांगेत थांबावे लागत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या समस्येमुळे प्रभावित झालेल्या बहुतेकांना २०१२ आणि २०१३ मध्ये आधार कार्ड मिळाली होती. केवळ काही कर्मचा-यांच्या चुकीमुळे लोकांना आधार सुविधा केंद्राला वारंवार भेट द्यावी पडते. कार्डवरील त्रुटी सुधारण्यासाठी पैसे भरून रांगेत ताटकळत थांबावे लागत असल्याने ही प्रक्रिया मनस्ताप ठरु लागली आहे. कार्डवर मोबाइल क्रमांक बदलण्यासाठी तीन-चार वेळा केंद्रावर जावे लागते. 

एका प्रकरणात, मडगाव येथील आधार सुविधा केंद्राबाहेर एका विद्यार्थ्यांच्या पालकांवर अर्जासाठी पहाटे ५.३० वाजता रांगेत उभे राहण्याची वेळ आली. कारण तिथे दिवसातून फक्त १५ अर्ज दिले जात होते आणि प्रति व्यक्ती एकापेक्षा जास्त अर्ज दिले जात नव्हते. याबाबत अनेक महिलांनी तक्रारी केल्या होत्या की त्यांना मुलांसोबत केंद्रावर यावे लागते.  दुस-यांच्या चुकांमुळे आम्हाला अडचणींना सामोरे जावे लागते, असे एका नागरिकाने सांगितले. दुस-याने सांगितले, तो व त्याच्या बहिणीला वारंवार केंद्रावर फेऱ्या माराव्या लागल्या. दोनवेळा तेथील दुरूस्ती अर्ज संपले होते, तर दुस-यावेळी अधिकारी नसल्याने त्यांना माघारी जावे लागले होते. यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला, असेही त्यांनी सांगितले.

एका महिला ग्राहकाने सांगितले की, कार्डवर मोबाइल क्रमांक अद्यावत करायला मला प्रथम पाटो-पणजी येथील खासगी इमारतीतील सुविधा केंद्रापैंकी एका ठिकाणी पाठविले. तिथे आम्ही तीन वेळा गेलो, पण प्रत्येक वेळी केंद्राचे दार बंद होते. त्यानंतर आम्ही पर्वरी येथील त्यांच्या मुख्यालयात गेलो. तिथे बराच संघर्ष केल्यानंतर त्यांनी दुरूस्ती करण्यास तयारी दर्शविली. दुरूस्तीचे हे काम आम्ही पणजीच्या एखाद्या बँकमधून सहजपणे करु शकलो असतो, हे आम्हाला नंतर समजले. असे त्या म्हणाल्या. 

याविषयी युआयडीएआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, एखाद्याचा मोबाइल क्रमांक आणि जन्मतारीख समाविष्ट करण्यासाठी कार्डमध्ये सुधारणा करणे अनिवार्य नाही. तसेच कार्ड तयार करताना मोबाइल क्रमांक दिला जातो. हा डेटा युआयडीएआयकडे असतो. मात्र, तो आधार कार्डवर छापलेला नसतो. तरीसुद्धा लोक चुका दुरूस्तीसाठी केंद्राला भेट देतात.

काहीवेळा एका व्यक्तीचे नाव विविध कागदपत्रांवर वेगळ्या पद्धतीने लिहिलेले असते. अशावेळी एका राजपत्रित अधिकाºयाकडून योग्य शब्दलेखन करून योग्य कागदपत्र सूपूर्द करावी.  दरम्यान, यूआयडीएआय संकेतस्थळावरून नवीन आधार कार्ड आणि दुरुस्तीसाठी अर्ज डाउनलोड केले जाऊ शकतात, परंतु नागरिकांनी सुधारणा आणि नोंदणी प्रक्रियेसाठी पैसे द्यावे लागतील.

अद्यायवत कसे करावे?

- युआडीआय पोर्टलवर विनंती करुन अर्जदार त्यांचे स्वत:चे आधार डेटा अपडेट करु शकतात. जिथे ते आधार क्रमांक आणि नोंदृणीकृत मोबाइल क्रमांक वापरून लॉगइन करू शकतात.

- अर्जदार कायम नोंदणीकृत केंद्राला भेट देऊन आॅपरेटरच्या मदतीने माहिती अद्ययावरत करु शकतो.

Web Title: Citizens' rush in aadhar card center to Improve Error

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.