मुख्यमंत्र्यांनी साधला आमदारांशी संवाद

By admin | Published: July 15, 2017 02:07 AM2017-07-15T02:07:09+5:302017-07-15T02:07:46+5:30

सर्व आमदारांची

Chief Minister interacted with the MLAs | मुख्यमंत्र्यांनी साधला आमदारांशी संवाद

मुख्यमंत्र्यांनी साधला आमदारांशी संवाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आठ दिवसांच्या अमेरिका भेटीनंतर शुक्रवारी सकाळी गोव्यात दाखल झाले. दुपारी त्यांनी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक घेतली व विविध विषयांबाबत तपशीलवार चर्चा केली.
दि. १७ रोजी राष्ट्रपती पदासाठी तर २१ रोजी राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. पर्रीकर यांनी त्याबाबत भाजपच्या सर्व आमदारांशी संवाद साधला. पर्वरी येथे मुख्यमंत्र्यांनी दुपारी एकच्या सुमारास भाजपच्या आमदारांची बैठक घेतली व मतदानाच्या दिवशी वेळेत या, असा सल्ला त्यांना दिला. राष्ट्रपती पदाच्या तसेच राज्यसभा निवडणुकीवेळी मतदान प्रक्रिया नेमकी कशी असेल ते तुम्हाला त्याच दिवशी सांगेन, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार रामनाथ कोविंद हे आज शनिवारी गोवा भेटीवर येत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना दिली.
दरम्यान, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. राज्यात मोठ्या प्रमाणात क्रॉसची मोडतोड सुरू आहे. या प्रकरणी चौकशी कामासाठी पोलिसांना
सक्रिय करा, अशी मागणी लोबो
यांनी केली. पोलिसांना जमत नसल्यास प्रकरण सीबीआयकडे द्या, असेही लोबो म्हणाले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी सीबीआयकडे प्रकरण द्यायला नको, गोवा पोलीसच हा विषय व्यवस्थित हाताळतील, थोडा धीर धरा, असा सल्ला लोबो यांना दिला. लोबो यांनीच ही माहिती मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Chief Minister interacted with the MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.