गोव्यात ब्रिटिश महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 08:25 AM2018-12-21T08:25:53+5:302018-12-21T08:26:15+5:30

संशयित जेरबंद : अन्य एका घरफोडी प्रकरणातही सहभाग

British woman raped in Goa | गोव्यात ब्रिटिश महिलेवर बलात्कार

गोव्यात ब्रिटिश महिलेवर बलात्कार

Next

मडगाव/काणकोण : काणकोण रेल्वेस्थानकावरून निघालेल्या ४८ वर्षीय ब्रिटिश महिलेवर गुरुवारी पहाटे बलात्कार करण्यात आला. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संशयित मडगाव रेल्वेस्थानक परिसरात सापडला. बलात्कारानंतर पोलिसांनी त्याला अटक केली; पण बलात्कारात त्याचा सहभाग आहे हे समजण्यासाठी सात तास जावे लागले.

संशयिताचे नाव रामचंद्रन (३०) असे असून तो तामिळनाडूतील तंजावरचा आहे. अन्य एका चोरीच्या प्रकरणात मडगाव रेल्वेस्थानकाच्या परिसरात त्याला पकडल्यानंतर काणकोणच्याही बलात्कारात आपला हात असल्याचे त्याने कबूल केले. आरोपीने घातलेल्या जाकीटवरून पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी या गुन्ह्याबद्दल चौकशी केली असता धागेदोरे सापडले. संशयिताकडे त्या ब्रिटिश महिलेच्या मालकीचा कॅमेराही सापडला. काणकोणच्या पाळोळे समुद्र किनाऱ्यावर उतरलेली ही ब्रिटिश महिला पहाटे चारच्या सुमारास रेल्वेस्थानकावर आली होती. रेल्वे यायला उशीर आहे हे समजल्यावर ती परतत असताना तिच्यावर बलात्कार झाला. त्यानंतर त्या इसमाने तिच्या बॅगेत असलेले २० हजार रुपये घेऊन पळ काढला.

सीसीटीव्हीमुळे पटली ओळख
पेडणे पोलीस घरफोडीच्या प्रकरणात फरारी आरोपीच्या शोधात मडगाव रेल्वेस्थानक परिसरात आले असता, फोनच्या लोकेशनवरून हा संशयित त्यांच्या तावडीत सापडला. त्या ब्रिटिश महिलेवर बलात्कार केल्याचा संशय असलेल्या आणि सीसीटीव्ही कॅमेºयात छबी टिपल्या गेलेल्या संशयिताच्या अंगावरील जाकीट आणि पकडलेल्या संशयिताच्या अंगावरील जाकीट एकाच प्रकारचे असल्याने पोलिसांनी या बलात्कार प्रकरणाबद्दलही चौकशी सुरू केल्यानंतर संशयिताने गुन्हा कबूल केला.

Web Title: British woman raped in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.