गोव्यात घटक पक्षांच्या धमक्यांमुळे भाजप आश्चर्यचकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 12:46 PM2018-05-25T12:46:50+5:302018-05-25T12:46:50+5:30

भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या विधानांमुळे व विविध मतदारसंघांतील हालचालींमुळे भाजप सध्या थोडा आश्चर्यचकीत झालेला आहे.

BJP is surprising due to threats from factional parties in Goa | गोव्यात घटक पक्षांच्या धमक्यांमुळे भाजप आश्चर्यचकीत

गोव्यात घटक पक्षांच्या धमक्यांमुळे भाजप आश्चर्यचकीत

Next

पणजी : भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या विधानांमुळे व विविध मतदारसंघांतील हालचालींमुळे भाजप सध्या थोडा आश्चर्यचकीत झालेला आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांना मुख्यमंत्रीपदी आम्ही बसवले, खनिज खाणी लोकसभा निवडणुकीपर्यंत जर खाणी सुरू झाल्या नाही तर लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला पाठींबा का द्यावा याविषयी फेरविचार करावा लागेल असा इशारा मंत्री विजय सरदेसाई यांनी दिल्यानंतर भाजपला धक्काच बसला आहे.
मुख्यमंत्री पर्रीकर हे गेल्या अडिच महिन्यांपासून अमेरिकेत आहेत. त्यांनी तीन मंत्र्यांची एक समिती गोव्याचा कारभार हाकण्यासाठी नेमली आहे पण त्या समितीला मर्यादित अधिकार आहेत. तीन मंत्र्यांच्या समितीपेक्षा जास्त अधिकार सध्या मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्री. कृष्णमूर्ती यांना आहेत. गोवा मंत्रिमंडळाची एकही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे गेल्या तीन महिन्यांत होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्री अडिच महिने अमेरिकेत असले तरी, तत्पूर्वी ते मुंबईत उपचार घेत होते. त्यामुळे सुमारे शंभर दिवस मुख्यमंत्री गोव्याबाहेर आहेत, आजारामुळे ते प्रशासकीय कामाबाबत सक्रिय राहू शकलेले नाहीत अशी स्थिती आहे. सध्या गोवा सरकारमधील अनेक मंत्री व आमदारही सुट्टीच अनुभवत आहेत. काहीच कामे होत नसल्याने आम्ही कुटूंबासोबत मे महिन्यात सुट्टीच अनुभवत आहोत असे एका मंत्र्याने सांगितले. सध्या पर्यटन मंत्री सहकुटूंब अमेरिकेला गेलेले आहेत. त्या शिवाय अन्य दोन मंत्री विदेशात आहेत. काही आमदारही गोव्याबाहेर आहेत. सरकारचा गाडा पुढे नेण्याची जबाबदारी सध्या गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या दोनच पक्षांवर आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले मंत्री सरदेसाई म्हणतात की, त्यांचा गोवा फॉरवर्ड हा पक्ष केंद्रातील एनडीएचा भाग आहे. तथापि, गोव्यातील खनिज खाणी जर सुरू झाल्या नाहीत तर लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला पाठींबा द्यावा की नाही हे आम्हाला ठरवावे लागेल. 
मंत्री सरदेसाई यांच्या या विधानावर विरोधी काँग्रेस पक्ष थोडा खूष झाला आहे. मात्र भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा मंत्री सरदेसाई यांच्याशी भाजप नेतृत्व बोलेल, खनिज खाणी भाजप सरकारने बंद केलेल्या नाहीत, काँग्रेस तसे चित्र उभे करू पाहत आहे असे नाईक म्हणाले.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा देखील भाजपप्रणीत आघाडी सरकारचा घटक पक्ष आहे. या पक्षाच्या नेत्यांनी आम्ही लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणो लढवू शकतो अशी विधाने चालवली आहेत. आपण एनडीएचा भाग नाही असे या पक्षाचे म्हणणो आहे. कुठच्याच पक्षाला लोकसभा निवडणुकीवेळी केंद्रात स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशा अर्थाचे विधान नुकतेच मगोपच्या नेत्यांनी केल्यामुळे भाजपमध्ये त्याबाबतही चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री र्पीकर विदेशात असल्याने गोव्यातील सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष वाट्टेल ते बोलत सुटले आहेत अशी भाजपमधील काही आमदारांची भावना होऊ लागली आहे.
 

Web Title: BJP is surprising due to threats from factional parties in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.