किनारी भागातील कर्णकर्कश संगीतावर होणार कारवाई, 

By काशिराम म्हांबरे | Published: March 19, 2024 03:55 PM2024-03-19T15:55:43+5:302024-03-19T15:58:08+5:30

शिवोली मतदार संघातील हणजूण-कायसूवा पंचायत क्षेत्रात विकसीत भारत योजने अंतर्गत उपस्थित नागरिकांना संबोधीत करताना ही माहिती दिली. डॉ. सावंत यांनी आज मंगळवारी  सकाळी हणजूण-कायसूवा पंचायत क्षेत्राचा दौरा केला. वेळी पंचायतीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

Action will be taken against loud music in coastal areas, | किनारी भागातील कर्णकर्कश संगीतावर होणार कारवाई, 

किनारी भागातील कर्णकर्कश संगीतावर होणार कारवाई, 

किनारी भागातील रहिवासी परिसरात रात्री १० नंतर खुल्या भागात ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करुन कर्णकर्कश संगीत वाजवल्यास त्याच्यावर कारवाई करुन ते बंद करण्यात येईल. तसे निर्देश पोलिसांना दिले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. शिवोली मतदार संघातील हणजूण-कायसूवा पंचायत क्षेत्रात विकसीत भारत योजने अंतर्गत उपस्थित नागरिकांना संबोधीत करताना ही माहिती दिली. डॉ. सावंत यांनी आज मंगळवारी  सकाळी हणजूण-कायसूवा पंचायत क्षेत्राचा दौरा केला. वेळी पंचायतीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाला त्यांच्या समवेत श्रीपाद नाईक, आमदार डिलायला लोबो, मायकल लोबो, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर पंचायतीचे पंच सदस्य आदी नेते उपस्थित होते. या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विविध घटकासमवेत बैठक घेऊन त्यांच्या सोबत चर्चा सुद्धा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी किनारी भागातील पारंपारिक घरे वाचवण्यासाठी तसेच त्यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी पावले उचलण्यात आली असल्याची माहिती चर्चे दरम्यान दिली. या संबंधी नवा कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तसेच श्रीपाद नाईक यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शक्तीच्या विरोधात संघर्ष करु असे मुंबईत केलेल्या विधानाचा निशेद केला. सनातन धर्मातील शक्तीचा कोणीच सर्वनाश करु शकत नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
 

Web Title: Action will be taken against loud music in coastal areas,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा