गोव्यात २६ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 09:45 PM2019-04-17T21:45:33+5:302019-04-17T21:45:53+5:30

गोव्यात एकूण २६ अतिसंवेदनशीर मतदान केंद्रे तर २४ संवेदनशीर मतदान केंद्रे घोषित करण्यात आली आहेत.

26 polling stations in Goa are susceptible | गोव्यात २६ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील

गोव्यात २६ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील

googlenewsNext

पणजी - गोव्यात एकूण २६ अतिसंवेदनशीर मतदान केंद्रे तर २४ संवेदनशीर मतदान केंद्रे घोषित करण्यात आली आहेत. मतदानाच्या पूर्वी व नंतर कायदा सुव्यवस्थेचे पालन व्हावे व आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी पोलीस मुख्यालयात बुधवारी निरीक्षक ते अधीक्षक पातळीवरील अधिकाºयांची पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी बैठक घेतली. गोव्यात विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी  आणि लोकसभेसाठी मतदान एकाचवेळी २३ एप्रील रोजी होत आहे. 

गोव्यात निवडणुका शांततापूर्ण वातावरणात होत असल्या तरी खबरदारी म्हणून काही पावले प्रशासनाला उचलावी लागता आहेत. मतदान केंद्रातील लोकसंख्या व सांस्कृतीक पार्श्वभुमी लक्षात घेऊन संवेदनशीर व अतिसंवेदनशील  मतदान केंद्रे घोषित करण्यात आली आहेत.  उत्तर गोव्यात ५ मतदानकेंद्रे तर दक्षीण गोव्यात २१ मतदान केंद्रे ही अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.  तसेच उत्तर गोव्यात १७ मतदान केंद्रे ही संवेदनशील तर दक्षीण गोव्यात ७ मतदानकेंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. इतर गोव्यातील मतदार येवून स्थाईक झालेल्या भागातील केंद्रांचा या संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रात सामावेश आहे. पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी ही माहिती दिली.  दरम्यान राज्यात निमलष्करी दळे २० एप्रील रोजी दाखल होणार आहेत. 

दरम्यान सिंग यांनी सर्व पोलीस अधिकाºयांची मुख्यालयात बैठक घेऊन कायदा सुव्यवस्था व निवडणूकीच्यावेळी लावण्यात येणाºया व्यवस्थेचा आढावा घेतला. आचार संहितेसंबंधीची सर्व माहिती  पोलीस कर्मचा-यांना ठाऊक असली पाहिजे. आपल्याला नेमून दिलेल्या वरिष्ठ अधिकाºयाच्या नेहमी संपर्कात कनिष्ठांनी राहावे. मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पोलीसांकडे सबंधित वरिष्ठ अधिकाºयाचे मोबाईल क्रमांक असले पाहिजेत याची खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना सिंग यांनी बैठकीत केली.

Web Title: 26 polling stations in Goa are susceptible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.