15 years of forced labor for government jobs, academic admission and other concessions | सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक प्रवेश आणि अन्य सवलतींसाठी १५ वर्षे निवासाची सक्ती निरुपयोगी
सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक प्रवेश आणि अन्य सवलतींसाठी १५ वर्षे निवासाची सक्ती निरुपयोगी

पणजी : गोव्यात सरकारी नोक-या तसेच शैक्षणिक प्रवेश आणि अन्य सवलतींसाठी १५ वर्षे निवासाच्या सक्तीचा परप्रांतीयांना रोखण्यासाठी कोणताही उपयोग होत नसल्याचा दावा करीत गोव्यात जन्मलेले आणि ज्यांचे आई, वडील गोमंतकीय आहेत, अशा मूळ गोवेकरांनाच राखीवता दिली जावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी केली आहे. उपसभापती मायकल लोबो यांनी परप्रांतीय गुन्हेगारांना हाताशी धरून व्होट बँक तयार केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत फर्नांडिस यांनी लोबो हे परप्रांतीयांना अभय देत असल्याचा आरोप केला. लोबो यांनी बंजारा समाजाच्या एका व्यक्तीला रेंट ए कार व्यवसायासाठी चारित्र्याचा दाखला दिला. कांदोळी, हडफडे, पर्रा भागातील परप्रांतीय गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांना लोबो यांच्याकडून अभय मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. पर्रा येथे बंजारा समाजाच्या लोकांची वसाहतच उभी राहिली आहे. हडफडें येथे स्पा, डान्स बार परप्रांतीयांकडून चालविले जातात. परप्रांतीयांनी या ठिकाणी गुन्हेगारी विश्वच निर्माण केले आहे, असे फर्नांडिस म्हणाले. ह्यरेंट ए कारह्णव्यवसायिकांनी ५ वर्षे न्यायालयीन लढा देऊन न्याय मिळविला. सरकारने पाच वर्षे त्यांच्या व्यवसायाचे नुकसान केले, असा आरोपही त्यांनी केला.
ह्यमूळ गोंयकारांना आरक्षण द्याह्ण
ते पुढे म्हणाले की, ह्यराज्यात परप्रांतीयांची संख्या एवढी वाढली आहे की, पुढील ५0 वर्षात गोमंतकीय नावालाही मिळणार नाहीत. महाराष्ट्रात सरकारने मराठ्यांना जसे आरक्षण दिले तसे मूळ गोंयकारांना नोकºया, शिक्षण तसेच अन्य बाबतीत आरक्षण द्यावे लागेल.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बूथ कार्यकर्ता सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या, अशी टीका त्यांनी केली.
 


Web Title: 15 years of forced labor for government jobs, academic admission and other concessions
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.