रूग्णालयाच्या निवासस्थानांना लोकार्पणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:22 AM2018-04-15T01:22:34+5:302018-04-15T01:22:34+5:30

ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने १ कोटी ८७ लाख रूपये खर्च करून १० निवासस्थाने बांधली आहेत. या निवासस्थानांचे काम दोन वर्षापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र सदर निवासस्थाने अजुनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत.

 Waiting for hospitality residences | रूग्णालयाच्या निवासस्थानांना लोकार्पणाची प्रतीक्षा

रूग्णालयाच्या निवासस्थानांना लोकार्पणाची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देदोन वर्षांपासून काम पूर्ण : आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन ठरले फोल

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने १ कोटी ८७ लाख रूपये खर्च करून १० निवासस्थाने बांधली आहेत. या निवासस्थानांचे काम दोन वर्षापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र सदर निवासस्थाने अजुनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत.
मागील वर्षी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आष्टी रूग्णालयाला भेट दिली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी निवासस्थानांबाबतची समस्या आरोग्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. लोकार्पण केले जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले. मात्र आता वर्षभराचा कालावधी उलटला तरी लोकार्पण झाले नाही. या निवासस्थानांचे बांधकाम २०१५ मध्ये करण्यात आले. मात्र या निवासस्थानांमध्ये पाण्याची व्यवस्था नाही व वीज पुरवठा झाला नाही. या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. याबाबत ग्रामीण रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. पडीक असलेल्या निवासस्थानांमध्ये असामाजिक तत्वांचा वापर वाढला आहे. काही युवक निवासस्थानांमध्ये अश्लिल चाळे करीत असतात. दारूड्यांसाठी दारू पिण्याचे ठिकाण बनले आहे. काही नागरिकांनी निवासस्थानांच्या काचाही तोडल्या आहेत. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे लोकार्पण होणे आवश्यक आहे.

Web Title:  Waiting for hospitality residences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.