वैरागड ग्रामपंचायतवर महिलांनी काढला घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:09 AM2019-05-27T00:09:13+5:302019-05-27T00:09:45+5:30

पाणींचाईने त्रस्त झालेल्या वैरागड येथील कुंभार मोहल्ल्यातील महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून पाणीटंचाई सोडवावी, अशी मागणी केली आहे. वैरागड येथे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. यावर्षी पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

Vahargad Gram Panchayat women took away the Ghaggar Morcha | वैरागड ग्रामपंचायतवर महिलांनी काढला घागर मोर्चा

वैरागड ग्रामपंचायतवर महिलांनी काढला घागर मोर्चा

Next
ठळक मुद्देपाणीटंचाई : नवीन पाणीपुरवठा योजना रखडली

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : पाणींचाईने त्रस्त झालेल्या वैरागड येथील कुंभार मोहल्ल्यातील महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून पाणीटंचाई सोडवावी, अशी मागणी केली आहे.
वैरागड येथे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. यावर्षी पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. वैलोचना नदीपात्रात असलेल्या नळ योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेला कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यातच शहरात पाण्याचे असमान वितरण होते. गावातील इंदिरानगर, गांधी चौक, कुंभार मोहल्ला या भागात पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांचा प्रशासनाविरोधात प्रचंड रोष आहे.
जिल्हा परिषद सदस्यांच्या वादात वैरागडची पाणीपुरवठा योजना रखडली, असा नागरिकांचा आरोप आहे. केवळ श्रेय आपल्याला मिळावे, या मानसिकतेमुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वैरागड येथील गोरजाई डोहावर पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. परंतु काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या नसल्याने ही योजना पूर्ण झाली नाही. वैरागड हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. दरवर्षी गावाची लोकसंख्या वाढत आहे. तसेच वस्तीही वाढत आहे. त्यामुळे वाढीव पाणी पुरवठा योजना होणे आवश्यक आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी सुद्धा लक्ष देत नसल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत आहे.

Web Title: Vahargad Gram Panchayat women took away the Ghaggar Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा