वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 10:51 PM2018-11-09T22:51:38+5:302018-11-09T22:53:05+5:30

अचानक पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी सोबत असलेल्या

In Tiger attack, farmers take serious, hospital treatment | वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू

googlenewsNext

गडचिरोली : शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर एका पट्टेदार वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि.९) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत किटाळी बिटमधील जंगलात घडली. तुळशीराम जगन रोहणकर(४५) रा.चुरमुरा असे गंभीर शेतकऱ्याचे नाव आहे.

रोहणकर हे आपल्या शेतावर काम करीत असताना अचानक पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी सोबत असलेल्या त्यांच्या पत्नीने आरडाओरड केल्यानंतर शेजारी शेळ्या राखत असलेली दोन मुले मदतीला धावली. त्यांनी वाघाच्या तावडीतून रोहणकर यांची सुटका केली आणि त्यांना गावात आणले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी एम.पी.चांगले, वनरक्षक नितीन गडपायले, प्रिया करकाडे, वनपाल विवेक राजूरकर यांनी जखमीची भेट घेऊन वनविभागातर्फे त्यांच्या कुटुंबीयांना १० हजार रुपयांची सानुग्रह मदत केली. रोहणकर यांच्यावर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: In Tiger attack, farmers take serious, hospital treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.