सिकलसेलबाबत अजूनही फारशी जागृती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:54 PM2018-06-18T22:54:38+5:302018-06-18T22:55:41+5:30

सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील नागरिकांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यामध्ये सुमारे दोन हजारपेक्षा अधिक रूग्ण सिकलसेलग्रस्त असल्याचे आढळून आले आहे.

There is still little awareness about the Sickleleas | सिकलसेलबाबत अजूनही फारशी जागृती नाही

सिकलसेलबाबत अजूनही फारशी जागृती नाही

Next
ठळक मुद्देदोन हजारपेक्षा अधिक रूग्ण : शासनाकडून मिळणाऱ्या सोईसुविधा तोकड्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील नागरिकांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यामध्ये सुमारे दोन हजारपेक्षा अधिक रूग्ण सिकलसेलग्रस्त असल्याचे आढळून आले आहे.
सिकलसेल हा रक्तातल्या लाल रक्तपेशीमध्ये होणारा आजार आहे. आपल्या रक्तात लाल पेशी व पांढºया पेशी अशा दोन प्रकारच्या पेशी आहेत. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरातील लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. पण सिकलसेल आजारामध्ये या पेशींचा आकार आॅक्सिजनचा पुरवठा मिळत नसल्याने विळ्यासारखा होतो. इंग्रजी भाषेत विळ्याला सिकल म्हणतात व सेल म्हणजे पेशी म्हणून या आजाराला सिकलसेल आजार असे संबोधले जाते. सिकलसेल आजार अनुवांशीक आहे. गर्भधारनेच्यावेळी जेनेरीक बदलामुळे हा आजार होतो. रक्तदोषामुळे उद्भवणारा हा दुर्धर आजार आहे. जन्मानंतर सिकलसेल रूग्णांच्या स्पर्शाने, त्याचे उष्टे अन्न खाल्याने, कपडे वापरल्याने, शारीरिक संबंध किंवा रक्त दुसºयास संक्रमित केल्याने दुसºया व्यक्तीला सिकलसेल आजार होत नाही. आई किंवा वडील दोघेही सिकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक व ग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह करणे टाळावे. सिकलसेल वाहक व्यक्ती (एएस) व सिकलसेलग्रस्त व्यक्ती असे दोन प्रकार सिकलसेल रूग्णांचे पडतात. राज्यात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जवळगाव, धुळे, नंदूरबार, रायगड, नांदेड, हिंगोली, पालघर या जिल्ह्यांमध्ये सिकलसेलग्रस्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात सिकलसेलग्रस्तांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.
सिकलसेलवरील उपाययोजना
सिकलसेल हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारीत होते. त्यामुळे लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर दोघांनीही सिकलसेल रक्ताची तपासणी करावी, सिकलसेल रूग्ण जन्माला येऊ न देण्याचे टाळावे, सिकलसेलवाहक व पीडित व्यक्तीने दुसºया वाहक व पीडित व्यक्तीशी लग्न टाळावे, सिकलसेल आजारी व्यक्तीने दररोज एक फॉलिक अ‍ॅसीडची गोळी सेवन करावी.
सिकलसेलग्रस्तांना शासनाकडून मिळणाऱ्या सोईसुविधा
सिकलसेलग्रस्तांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ६०० रूपये अनुदान दिले जाते. या रूग्णांना दररोज मोफत फॉलिक अ‍ॅसीड गोळ्या, रक्त पुरवठा, औषध व उपचार प्रदान करण्यात येते. राज्य रक्तसंक्रमण परिषद मुंबईकडून सिकलसेल ओळखपत्र तयार करून दिला जातो. दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रती तास २० मिनिटे अधिकचे दिले जातात.
सिकलसेलची लक्षणे
हातापायावर सूज येणे, सांधे सूजणे, दुखणे, असह्य वेदना होणे, सतत सर्दी, खोकला होणे, अंगात बारीक ताप राहणे, डोळे पिवळसर दिसणे, हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे.

Web Title: There is still little awareness about the Sickleleas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.