सुशिक्षितांनी जनजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:38 PM2018-01-11T23:38:45+5:302018-01-11T23:38:59+5:30

विकासाची अद्याप चाहूल न लागल्याने जंगल, दऱ्या-खोऱ्यात राहून कष्टप्रद जीवन जगणाऱ्या आदिवासी समाजाने विकासाच्या प्रवाहात येण्याकरिता शिक्षण व संघटन मजबुतीचे महत्त्व ओळखावे.

 Teachers should create awareness | सुशिक्षितांनी जनजागृती करावी

सुशिक्षितांनी जनजागृती करावी

Next
ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : खेडगाव येथे आदिवासी समाज प्रबोधन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : विकासाची अद्याप चाहूल न लागल्याने जंगल, दऱ्या-खोऱ्यात राहून कष्टप्रद जीवन जगणाऱ्या आदिवासी समाजाने विकासाच्या प्रवाहात येण्याकरिता शिक्षण व संघटन मजबुतीचे महत्त्व ओळखावे. समाजातील सुशिक्षीत तरूणांनी पुढाकार घेऊन समाज जागृती करावी, असा सूर खेडेगाव येथे आयोजित प्रबोधन मेळाव्यात मान्यवरांनी काढला.
आदिवासी भगवान बिरसा मुंडा मंडळ व राणी दुर्गावती महिला मंडळ खेडेगाव यांच्या वतीने बुधवारी आदिवासी समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पं.स. सभापती गिरीधर तितराम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी, माजी जि.प. सदस्य नंदू नरोटे, राजकुमारी मडकाम, तालुका काँग्रेस अध्यक्ष जयंत हरडे, रायुकाँचे माजी जिल्हाध्यक्ष किशोर तलमले, सरपंच टेमनशहा सयाम, उपसरपंच लोकचंद दरवडे, माजी पं.स. सभापती भागरथा नैताम, पोलीस पाटील परसराम नाट, दिलीप दर्रो, यशवंत पाटणकर, सरपंच उमाजी धुर्वे, कांता टेकाम, उपसरपंच दामोधर वट्टी, तानाजी कुमोटी, ग्रामसेवक लांजेवार, देविदास बन्सोड, तंमुस अध्यक्ष विश्वनाथ मेश्राम, तुकाराम डोंगरवार, कैलाश कल्लो, दुर्वास बनकर, पीतांबर बह्याड, भजन कन्नाके, ऋषी हलामी, जयराम पुराम, डॉ. टेंभुर्णे, तुकाराम सहारे, दुर्वास बनकर, दिगांबर बनकर, पदीराम कुमरे, बालाजी मेश्राम, रतीराम दर्रो, पांडुरंग तुलावी, चिंतामन सहारे, कैलाश मडावी, राठोड, कापगते, कुरेशी उपस्थित होते. मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रास्ताविक दिलीप कवडो, संचालन होमराज कवडो तर आभार उत्तम मडावी यांनी मानले.
ज्वलंत प्रश्नांवर मार्गदर्शन
आदिवासी समाजाच्या अधिकाराबाबत दक्ष राहून सर्वांगिण विकास साधावा, तसेच वेगळ्या विदर्भ राज्यासाठी संघर्ष करावा, समाजाने विकासाची कास धरावी. शिष्यवृत्ती बंद पाडण्याच्या शासनाच्या षड्यंत्राचा तीव्र विरोध करावा, असे आवाहन मार्गदर्शकांनी केले.

Web Title:  Teachers should create awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.