पर्यवेक्षीय यंत्रणेने प्रथम स्वत: शिकावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:36 PM2017-12-18T23:36:51+5:302017-12-18T23:37:15+5:30

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यापूर्वी पर्यवेक्षिय यंत्रणेने एखादे तंत्र स्वत: समजून घेतले पाहिजे,

The supervisory system should first learn to self | पर्यवेक्षीय यंत्रणेने प्रथम स्वत: शिकावे

पर्यवेक्षीय यंत्रणेने प्रथम स्वत: शिकावे

Next
ठळक मुद्देनंदकुमार यांचे आवाहन : गटशिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुखांकडून आढावा

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यापूर्वी पर्यवेक्षिय यंत्रणेने एखादे तंत्र स्वत: समजून घेतले पाहिजे, नंतर मार्गदर्शन केले पाहिजे, कोणतीही गोष्ट साध्य करताना हे शक्य आहे, असा मूलमंत्र कायम ठेऊन सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करावा, असे आवाहन शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे प्रधान सचिव व नंदकुमार यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी यांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, विद्या परिषदेचे संचालक डॉ. सुनील मगर, शिक्षण सल्लागार सिद्धेस वाडकर, गोदणे, शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, डी.आय.ई.सी.पी.डी.चे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील, शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुढे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख उपस्थित होते.
आढावा बैठकीदरम्यान पायाभूत चाचणी, संकलीत मूल्यमापन, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळासिद्धी, डिजिटल शाळा, टेक्नोसेवी शिक्षक, विविध शैक्षणिक अ‍ॅप यावर चर्चा केली. २२ जून २०१५ च्या पीएसएम व १६ सप्टेंबर २०१६ च्या माध्यमिकस्तर शासन निर्णयावर चर्चा केली. प्राथमिक शाळेतील गुणवत्तेस माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल, गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी करणे, एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, याची काळजी घेणे, दाखल झालेल्या सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या, असे मार्गदर्शन शिक्षण संचालक डॉ. सुनील मगर यांनी केले.
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी डिजिटल शैक्षणिक साहित्य खरेदी केले आहेत. सदर साहित्याचा वापर प्रत्येक शिक्षकाने करावा, यासाठी केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. यशस्वीतेसाठी जि.प. कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title: The supervisory system should first learn to self

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.