एसटीची स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:43 PM2017-10-02T23:43:02+5:302017-10-02T23:43:16+5:30

एसटी हे सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे प्रवासी वाहन आहे. एसटीमधून दरदिवशी हजारो प्रवासी प्रवास करतात.

ST Cleanliness is the responsibility of all | एसटीची स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी

एसटीची स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी

Next
ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : गडचिरोली आगारात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एसटी हे सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे प्रवासी वाहन आहे. एसटीमधून दरदिवशी हजारो प्रवासी प्रवास करतात. बसस्थानकांवरही प्रवाशांची मोठी गर्दी राहते. त्यामुळे एसटीची स्वच्छता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी मिळून ही जबाबदारी पार पाडल्यास एसटी निश्चितच स्वच्छ राहील, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.
गडचिरोली आगाराच्या वतीने गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता मोहिमेचा सोमवारी शुभारंभ केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. डॉ. देवराव होळी, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, विभागीय वाहतूक अधिकारी नीलेश बेलसरे, आगारप्रमुख विनेश बावणे, चादुलवार आदी मान्यवर उपस्थित होते. आ. होळी यांनी मार्गदर्शन करताना गरीब नागरिकांसोबत एसटीची नाळ जोडली आहे. प्रवाशांना चांगली सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या वेळी ध्वनीक्षेपकाची व्यवस्था न केल्याबाबत नाराजी व्यक्त केली. प्रास्ताविक आगार प्रमुख विनेश बावणे, संचालन अरूण पेंदाम तर आभार प्रदीप सालोटकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुनील खोब्रागडे, सुरेश येरमे, पवन बासमवार, राजू चौधरी यांच्यासह एसटी आगारातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title: ST Cleanliness is the responsibility of all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.