बांधावरील लोकगीताचे स्वर लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:31 AM2017-07-22T00:31:36+5:302017-07-22T00:31:36+5:30

‘चंदन गडचा राजा चंदन, पत्नी त्याची आंबाबाई व कन्या त्याची आंबिल, कन्या त्याची नागवल’ अशा प्रकारच्या लोकगीतात एखाद्या पौराणिक,

The sound of folk songs on the band | बांधावरील लोकगीताचे स्वर लुप्त

बांधावरील लोकगीताचे स्वर लुप्त

Next

ग्रामीण साज हरविला : घड्याळीच्या काट्यावर असतात मजुरांच्या नजरा
प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : ‘चंदन गडचा राजा चंदन, पत्नी त्याची आंबाबाई व कन्या त्याची आंबिल, कन्या त्याची नागवल’ अशा प्रकारच्या लोकगीतात एखाद्या पौराणिक, काल्पनिक कथेचा आधार घेऊन त्यालाच स्वर गुंफत नेऊन ही कथा शेताच्या बांधावर रोवणीचे काम करताना अनेक महिला व्यस्त दिसून येत होत्या. मनोरंजनासोबतच श्रम परिहार करणे आणि सत्व व तत्त्व जपणाऱ्या या काल्पनीक कथा वास्तव जीवनात अनुसरण करणे, असा या लोककथा व लोकगिताचा ग्रामीण समाजात महत्त्वाचे स्थान होते. पण अलिकडे शेतीच्या बांधावरील लोकगिताचे स्वर आता लुप्त झाले आहेत. परिणामी ग्रामीण जीवनाचा साद हरविला आहे.
पूर्व विदर्भातील धान पट्ट्याच्या भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात खरीपाच्या धान रोवणीच्या वेळी या लोकगिताची धूम चालायची. एकदा महिला रोवणीसाठी शेत जमिनीत उतरल्या की, पूर्व परंपरेने चालत आलेल्या गीताचा सूर धरायच्या आणि इतरांनी त्याला प्रतिसाद द्यायचा. त्यातही आपले हे श्रम परमेश्वराच्या चरणी अर्पण करते, असा आशय बऱ्याच लोकगितातून स्पष्ट होत असतो.
‘ऐवढा रोवणा रोवलो भोलेनाथा, तुझा सवभुई ऐवढा रोवणा रोवलो धरणीमाये तुझ्या सवभुई’ आपल्या अंगी निर्माण होणार बळ परमेश्वराच्या कृपेने निर्माण होते. करविता धनी तो ईश्वर आहे. आपण निमित्त मात्र असे गुणगाण करताना या लोकगितातून तत्कालीन लोकजीवनाचे दर्शनही घडते.
आधुनिकतेच्या नावाखाली बरेच बदल झाले. खिल्लाऱ्या बैलाच्या जोडीच्या गळ्यातील घुंगराच्या मधूर स्वराऐवजी ट्रॅक्टरचा कर्कश आवाज शेतात घुमत आहे. लोकगिताच्या तालात मग्न असलेल्या मजुरांना पूर्वेचा सूर्य पश्चिमेला कधी गेला हे कळायचे नाही. आता मजुरांच्या नजरा घड्याळीच्या काट्यावर असतात.

Web Title: The sound of folk songs on the band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.