मार्कंडेश्वराच्या पालखीला उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:16 AM2019-03-09T01:16:25+5:302019-03-09T01:19:08+5:30

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे जत्रेनिमित्त शुक्रवारी मार्कंडेश्वराची पालखी काढण्यात आली. या पालखीला भाविकांची गर्दी उसळली. दुपारी १ वाजताच्या सुमारास जि.प. सदस्य अतुल गण्यारपवार व त्यांच्या सौभाग्यवती साधना गण्यारपवार यांनी सपत्नीक यांनी पालखीची पूजा केली.

The rush of Markandeshwar's rush | मार्कंडेश्वराच्या पालखीला उसळली गर्दी

मार्कंडेश्वराच्या पालखीला उसळली गर्दी

Next
ठळक मुद्देहजारो भाविकांची गर्दी : पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली पालखी

लोकमत न्यूज नेटवर्क
मार्कंडादेव : चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे जत्रेनिमित्त शुक्रवारी मार्कंडेश्वराची पालखी काढण्यात आली. या पालखीला भाविकांची गर्दी उसळली.
दुपारी १ वाजताच्या सुमारास जि.प. सदस्य अतुल गण्यारपवार व त्यांच्या सौभाग्यवती साधना गण्यारपवार यांनी सपत्नीक यांनी पालखीची पूजा केली. मंदिरातून दुपारी ३.१५ वाजता पालखी काढण्यात आली. संपूर्ण यात्रेतून पालखी फिरविण्यात आली.
पालखीसोबत मार्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, रामू तिवाडे, रामू गायकवाड, बालस्वामी पिपरे, तहसीलदार अरूण येरचे, त्यांच्या पत्नी नंदा येरचे, भारतीय पुरातत्व विभाग सहायक संरक्षण अधिकारी पशिने, छबीलदास सुरपाम, दिलीप चलाख, जयराम चलाख, प्रभारी पोलीस अधिकारी निशा खोब्रागडे, कुमोद भानारकर आदी उपस्थित होते.
टिपूर लावल्यानंतर मार्र्कंडेश्वराची निघणारी पालखी महत्त्वाचा उत्सव मानला जातो. जे भाविक टिपूराच्या दिवशी उपस्थित राहू शकत नाही. ते भाविक मार्कंडेश्वराच्या पालखीच्या दिवशी उपस्थित राहून मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेऊन स्वत:ला धन्य मानतात.
मार्कंडादेव जत्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. आंघोळींना सुरूवात झाली आहे. त्यामुळे गर्दी कायम आहे. ही गर्दी पुन्हा तीन ते चार दिवस राहणार आहे. त्यानंतर आपोआप गर्दी ओसरेल. यावर्षीही मोठ्या प्रमाणात मनोरंजनाची साधने जत्रेत आली आहेत.

शनिवारी व रविवारी उसळेल गर्दी
९ मार्चचा शनिवार हा महिन्यातील दुसरा शनिवार आहे. या दिवशी सुटी आहे. शनिवारला जोडून रविवारी येत आहे. कर्मचाऱ्यांना सलग दोन दिवसांच्या सुट्या येत आहेत. त्यामुळे शनिवारी व रविवारी मार्कंडादेव येथे भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे. सोमवारनंतर यात्रेकरूंची संख्या कमी होत जाईल.

Web Title: The rush of Markandeshwar's rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.