कर्जमाफीसाठी पुनर्पडताळणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:06 AM2017-11-15T00:06:53+5:302017-11-15T00:07:08+5:30

कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या यादीचा (ग्रीन लिस्ट) घोळ अजूनही संपलेला नाही.

Repayment for debt waiver continues | कर्जमाफीसाठी पुनर्पडताळणी सुरू

कर्जमाफीसाठी पुनर्पडताळणी सुरू

Next
ठळक मुद्देग्रीन लिस्ट रखडली : १४०० लाभार्थ्यांवरील आक्षेप तपासणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या यादीचा (ग्रीन लिस्ट) घोळ अजूनही संपलेला नाही. जिल्हा उपनिबंधकांनी पडताळणी करून राज्य शासनाकडे पाठविलेल्या पात्र शेतकºयांच्या याद्यांमधून १४०० शेतकºयांची यादी कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ग्रीन लिस्टमध्ये टाकण्यात आली. मात्र चावडीवाचनातून त्यांच्या नावावरील आक्षेपांची पुनर्पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे त्या शेतकºयांसाठी कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी अजून प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी जिल्हा सहकारी बँक आणि राष्टÑीयकृत बँकांचे मिळून जिल्ह्यातील ४० हजारांच्या घरात शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता आहे. मात्र राज्य शासनाने त्या शेतकºयांच्या यादीला अजून अंतिम स्वरूप दिलेले नाही. गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात संबंधित गावांमध्ये चावडीवाचन होऊ शकले नव्हते. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर त्या गावांमध्ये चावडीवाचन घेण्यात आले. त्यात काही शेतकºयांच्या नावांवर गावकºयांनी आक्षेप घेत ते निकषात बसत नसल्याचे सांगितले. त्या सर्व आक्षेपांची पडताळणी आता सुरू आहे.
जिल्ह्यातील किती शेतकºयांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळून त्यांचे सातबारा कधी कोरे होणार, याची प्रतीक्षा सर्वच शेतकºयांना लागली आहे. पण अनेक अटींमुळे लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी वेळ लागत आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २५ हजार ९६८ खातेधारक शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. मात्र राज्य शासनाकडून त्या यादीची स्क्रुटनी पूर्ण झाल्याशिवाय त्यांने नाव ग्रीन लिस्टमध्ये पोहोचणार नाही. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल असा विश्वास जिल्हा उपनिबंधक पांडे यांनी व्यक्त केला.

Web Title: Repayment for debt waiver continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.