शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:21 AM2018-11-15T01:21:52+5:302018-11-15T01:25:04+5:30

अखेरच्या एका पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट झाले. तोंडाजवळ आलेला घास हिरावल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शेतकऱ्यांचे उत्पादन घटणार आहे.

NCP's agitation for the rights of farmers | शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

Next
ठळक मुद्देसरकारच्या धोरणावर टीका : गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अखेरच्या एका पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट झाले. तोंडाजवळ आलेला घास हिरावल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शेतकऱ्यांचे उत्पादन घटणार आहे. ही वास्तविकता असून सुद्धा शासनाने दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या यादीत गडचिरोलीचा समावेश केला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधव नाराज झाले आहेत. या मुद्याला घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात याव, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली आहे. दरम्यान राकाँच्या अनेक पदाधिकाºयांनी विद्यमान सरकारच्या धोरणावर जोरदार टिका केली.
या आंदोलनाचे नेतृत्व राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले. या आंदोलनात महिलाआघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक झरकर, तुकाराम पुरणवार, प्रकाश ठाकरे, विवेक बाबणवाडे, रोशन राऊत, अब्दुल कबिर शेख, बरखत अली सय्यद, जुगनुसिंग पटवा, धनराज डोईजड, मलय्या कालवा, रफिक मोहम्मद शेख, क्रिष्णालाल पुरामे, जगन जांभुळकर, अविनाश वरगंटीवार, बंडू कोवे, कवडू बावणे, गोपी मडावी, डॉ. देविदास मडावी, सुलोचना मडावी, नितीन खोब्रागडे, देविदास आखाडे, संजय कोचे, मनिषा खेवले, निशा रामटेके, देवाजी नरूले, नजमुद्दीन खान, बुध्दाजी सिडाम, प्रकाश मुद्दमवार, रामदास गोंडाणे, जे. एम. मुप्पीडवार, राजू नैताम आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
यात राष्ट्रवादी काँग्रेसने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दयनिय परिस्थिती मांडली आहे.

Web Title: NCP's agitation for the rights of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.