नक्षली आवाहन झुगारून केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:24 PM2019-04-15T22:24:20+5:302019-04-15T22:24:41+5:30

तालुक्यातील २७ मतदान केंद्रांवर ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नक्षल्यांच्या आवाहनाला न जुमानता तालुक्यातील एकूण २० हजार ५३२ मतदारांपैकी ११ हजार ८३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Naxalites made sloganeously voted to vote | नक्षली आवाहन झुगारून केले मतदान

नक्षली आवाहन झुगारून केले मतदान

Next
ठळक मुद्देसाडेपाच हजार जणांनी बजावला हक्क : २७ संवेदनशील बुथवर मतदारांचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील २७ मतदान केंद्रांवर ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नक्षल्यांच्या आवाहनाला न जुमानता तालुक्यातील एकूण २० हजार ५३२ मतदारांपैकी ११ हजार ८३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान करणाऱ्यांमध्ये ५ हजार ५२३ पुरूष व ५ हजार ३०९ महिला मतदारांचा समावेश आहे. रखरखत्या उन्हातही १० ते १५ किमीची पायपीट करून गावातील नागरिकांनी शेजारच्या गावी असलेल्या केंद्रावर जाऊन उत्साहात मतदान केले. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही भामरागड तालुक्याच्या अनेक गावांना जोण्यासाठी पक्का रस्ता नाही. शिवाय अनेक मूलभूत समस्यांचा अभाव आहे. असे असतानासुद्धा आज ना उद्या आपच्या भागाचा विकास होईल, असे स्वप्न उराशी बाळगून तालुक्याच्या दुर्गम भागातील मतदारांनी लोकशाही व्यवस्थेवर विश्वास टाकला. सदर निवडणुकीच्या प्रचार कालावधीदरम्यान नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी बॅनर लावून मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. दरम्यान नक्षल्यांच्या या आवाहनामुळे परिसरात नक्षली दहशत पसरली होती. मात्र निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे तालुक्याच्या दुर्गम भागात चांगले मतदान झाले.
तालुक्याच्या गोंगवाडा, नेलगुंडा, भटपार, गोलगुड्डा येथील नागरिकांनी धोडराज येथील मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. लाहेरी परिसरातील बिनागुंडा, हेडरी, मल्लमपोडूर येथील मतदारांनी लाहेरीच्या केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. प्रशासकीय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी वाहनांची व्यवस्था केली.

Web Title: Naxalites made sloganeously voted to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.