मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:50 AM2017-12-02T00:50:54+5:302017-12-02T00:51:13+5:30

कुणबी समाज संघटनेच्या वतीने १७ डिसेंबर रोजी रविवारला स्थानिक धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर कुणबी समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

The movement will be the direction of agitation | मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरणार

मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरणार

Next
ठळक मुद्देतयारी जोमात : १७ डिसेंबरला गडचिरोलीत कुणबी समाज मेळावा; नॉनक्रिमिलेअरच्या मुद्यावर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुणबी समाज संघटनेच्या वतीने १७ डिसेंबर रोजी रविवारला स्थानिक धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर कुणबी समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यादरम्यान ओबीसींच्या नॉनक्रिमिलेअरच्या मुद्यावर विचारमंथन करण्यात येणार आहे. त्यानंतर ठोस निर्णय घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
गडचिरोली येथे जिल्हास्तरावर होणारा कुणबी समाज मेळावा यशस्वी करण्यासाठी या समाज संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व युवक कामाला लागले आहेत. जिल्ह्याच्या १२ ही तालुक्यात तालुकास्तरावर कुणबी समाज संघटनेच्या बैठका घेतल्या जात आहेत. १ डिसेंबर रोजी शुक्रवारी चामोर्शी येथे कुणबी समाज संघटनेची सभा पार पडली.
यापूर्वी देसाईगंज, आरमोरी तसेच गडचिरोली येथेही सभा पार पडल्या आहेत. मेळाव्याच्या माध्यमातून कुणबी समाज आता एकवटणार आहे. संघटन शक्ती वाढविण्यासाठी तसेच नियोजन करण्यासाठी आरमोरी मार्गावर कुणबी समाज संघटनेचे कार्यालयही सुरू करण्यात आले आहे. १७ डिसेंबर रोजी होणाºया मेळाव्यात समाजाच्या वर्ष २०१८ च्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात येणार आहे, अशी माहिती महेंद्र ब्राह्मणवाडे, रत्नदीप म्हशाखेत्री यांनी लोकमतला दिली आहे.
समाजाचे पुढारी येणार
१७ डिसेंबर रोजी रविवारला गडचिरोेली येथे होणाºया मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून खासदार नाना पटोले, आ. बाळू धानोरकर यांच्यासह समाजाचे अनेक राजकीय पुढारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी महाविद्यालयाच्या मैदानात प्रशस्त शामियाना उभारण्यात येणार आहे.
वैचारिक प्रबोधन होणार
मेळाव्यादरम्यान समाजाची दशा व दिशा समाजबांधवांना माहित व्हावी, तसेच आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणते पाऊल उचलावे लागेल, याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. प्रा. ज्ञानेश वाकुडकर, वैष्णवी डफ यांच्यासह अनेक वक्ते येथे हजेरी लावणार आहेत.

Web Title: The movement will be the direction of agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.