पाच पांडव देवतांची यात्रा भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:38 AM2018-04-04T01:38:38+5:302018-04-04T01:38:38+5:30

अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाच पांडव देवतांची यात्रा भरविली जाते. यंदाही कमलापूर येथे पाच पांडव देवतांची यात्रा भरविण्यात आली.

The journey of five Pandava deities was filled | पाच पांडव देवतांची यात्रा भरली

पाच पांडव देवतांची यात्रा भरली

Next
ठळक मुद्देकमलापुरात आयोजन : बोनालू कार्यक्रम उत्साहात; हजारो भाविकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाच पांडव देवतांची यात्रा भरविली जाते. यंदाही कमलापूर येथे पाच पांडव देवतांची यात्रा भरविण्यात आली. या यात्रेदरम्यान बोनालू कार्यक्रम पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवून देवतांचे दर्शन घेतले.
महाभारत काळापासून पाच पांडव देवतांची भारतात अनेक ठिकाणी मोठ्या श्रध्देने पूजाअर्चा केली जाते. कमलापूर येथे सदर यात्रा पाच पांडव मंदिर परिसरात पार पडली. पाच पांडव देवतांची पूजाअर्चा करून बोनालू कार्यक्रम घेण्यात आला. या यात्रेत कमलापूर परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते.
गावामध्ये सुखशांती लाभावी, गावाचा झपाट्याने विकास व्हावा, अशाप्रकारचे साकडे देवांना घातले. शेवटी महाप्रसाद वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाच पांडव उत्सव समितीचे पदाधिकारी लक्ष्मण बुचय्या कोडापे, सूमन लक्ष्मण कोडापे, पुरूषोत्तम येजुलवार, बकय्या चौधरी, मलय्या चौधरी, मुमख्खा आत्राम, हनमंतू चौधरी, समय्या येजुलवार, लालू कोडापे, कन्हैय्या चौधरी, हनमंतू कोडापे, गणेश कोडापे, राकेश कोडापे, राडा कोडापे, नामदेव इस्मूल, चिरंजीव येजुलवार, श्रीनिवास कोडापे, दोगा आत्राम आदींसह गावातील भाविकांनी सहकार्य केले.
पाच पांडव यात्रेतून कमलापूर परिसरातील बांधव पारंपारिक संस्कृती सातत्त्याने जोपासत आहेत. सदर यात्रेदरम्यान भाविकांनी पूजाअर्चा करून तसेच आरती करून पाच पांडवांचे दर्शन घेतले. यावेळी या भागातील काही लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.

Web Title: The journey of five Pandava deities was filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.