गावालगतचे तलाव कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 11:37 PM2019-05-04T23:37:08+5:302019-05-04T23:37:40+5:30

वाढत्या तापमानामुळे तसेच भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील तलाव, बोड्या, नदी, नाले कोरडे पडले आहेत. परिणामी पाळीव जनावरांसह नागरिकांपुढे पाणी टंचाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

Gawl lake dry | गावालगतचे तलाव कोरडे

गावालगतचे तलाव कोरडे

Next
ठळक मुद्देपाणीटंचाईची समस्या तीव्र । पाळीव जनावरांसह नागरिकांपुढे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : वाढत्या तापमानामुळे तसेच भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील तलाव, बोड्या, नदी, नाले कोरडे पडले आहेत. परिणामी पाळीव जनावरांसह नागरिकांपुढे पाणी टंचाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
गडचिरोली हा जंगलाचा जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळखल्या जातो. येथे ७८ टक्के जंगल असूनही पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन व साठवणूक होत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचे सावट निर्माण होत असते. चामोर्शी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी तलाव, बोड्या आहेत. पावसाळ्यात बऱ्यापैकी पर्जन्यमान झाले. मात्र पावसाच्या पाण्याचे साठवणूक व्यवस्थेअभावी करता आली नाही. परिणामी पावसाळ्यात भरलेले तलाव आता पूर्णत: कोरडे पडले आहे. पाळीव जनावरांची तहाण कशी भागवावी, असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागातील अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तसेच हातपंपाची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा गावालगतचा तलाव पूर्णत: कोरडा पडला आहे. अनेक ठिकाणच्या हातपंपाला पाणी येत नाही. सार्वजनिक विहिरींची पाणी पातळी खालावल्याने भेंडाळावासीयांची पायपीट सुरू आहे.

Web Title: Gawl lake dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.