गौणवनोपजावर प्रक्रिया केंद्र स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:07 AM2018-02-17T01:07:02+5:302018-02-17T01:07:36+5:30

‘विना सहकार, नाही उद्धार’ या उक्तीनुसार आपणास सहकार क्षेत्राचे जाळे वाढवून प्रगती साधता येईल. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के वनसंपदा उपलब्ध आहे.

Establish a sub-processor processing center | गौणवनोपजावर प्रक्रिया केंद्र स्थापन करा

गौणवनोपजावर प्रक्रिया केंद्र स्थापन करा

Next
ठळक मुद्देसहकारमंत्र्यांनी घेतला आढावा : शेतमाल तारण योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना केले आवाहन

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : ‘विना सहकार, नाही उद्धार’ या उक्तीनुसार आपणास सहकार क्षेत्राचे जाळे वाढवून प्रगती साधता येईल. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के वनसंपदा उपलब्ध आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात बळकटी येण्यासाठी येथील गौण वनोपजावर सहकार क्षेत्रात प्रक्रिया केंद्र स्थापन करा, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, आ. कृष्णा गजबे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, संचालक लाकडे, ज्ञानेश्वर आखाडे, अरविंद वानखेडे, संतोष पटेल, अमित देशमुख, सहायक निबंधक पी.बी. पाटील, एल.एस. रंधये, एस.पी. बंदेलवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. देशमुख म्हणाले, सहकारी संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सहकार क्षेत्राचा व्याप वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत सहकार तत्त्वावर पाच भातगिरण्या सुरू आहेत. आणखी भात गिरण्याची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे व या भातगिरण्या निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
सहकार क्षेत्रात नाविण्यपूर्ण सहकारी संस्थांची स्थापना करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर यावेळी चर्चा करण्यात आली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात जानेवारी अखेर नियोजित गडचिरोली एमएच सीएससी व्हिलई कोआॅपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड गडचिरोली जिल्हा गडचिरोली या संस्थेचे नाव आरक्षित करण्याबाबत प्रस्ताव जिल्हास्तरावर प्राप्त झाला. तसेच ही संस्था नाविण्यपूर्ण असून या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ४५० सीएसी व्हिएलई सेंटर्स चालकांना सहकाराच्या माध्यमातून कामे मिळून रोजगार उपलब्ध होण्याची योजना प्रस्तावित असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

Web Title: Establish a sub-processor processing center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.