ठेका पद्धतीमुळे धान रोवणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:29 AM2018-07-12T01:29:45+5:302018-07-12T01:31:16+5:30

तालुक्यातील मुरखळा परिसरात मोठ्या प्रमाणावर धानाची शेती केली जाते. सध्या समाधानकारक पाऊस पडत असल्याने या भागात धान रोवणीला वेग आला आहे. प्रति एकर चार हजार रूपये प्रमाणे ठेका पद्धतीने धान पऱ्हे खोदणे व रोवणीचे काम केले जात असल्याने धान रोवणीच्या कामाला वेग आला आहे.

Due to contractual mechanism, paddy rozivan can speed up | ठेका पद्धतीमुळे धान रोवणीला वेग

ठेका पद्धतीमुळे धान रोवणीला वेग

Next
ठळक मुद्देप्रतिएकर चार हजार रूपये : चामोर्शी तालुक्यात मजुरांना अधिक मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यातील मुरखळा परिसरात मोठ्या प्रमाणावर धानाची शेती केली जाते. सध्या समाधानकारक पाऊस पडत असल्याने या भागात धान रोवणीला वेग आला आहे. प्रति एकर चार हजार रूपये प्रमाणे ठेका पद्धतीने धान पऱ्हे खोदणे व रोवणीचे काम केले जात असल्याने धान रोवणीच्या कामाला वेग आला आहे. अनेक मजुरांना एक ते दीड महिना बऱ्यापैैकी आर्थिक मिळकत होत आहे.
पारंपरिक पद्धतीने शेती करीत असताना मजुरांचा तुटवडा या समस्येचा शेतकऱ्यांना दरवर्षी सामना करावा लागतो. धान रोवणीच्या हंगामात मजूर मिळत नसल्याने चार ते पाच हेक्टरवरील शेतकरी ठेका पद्धतीने धान रोवणीचे काम मजुरांकरवी करीत असतो. चामोर्शी तालुक्यात या पद्धतीने सर्वाधिक धान रोवणी केली जाते.
ठेका घेणारे हे मजूरच असल्याने ते सकाळी ६ वाजतापासूनच शेतात दाखल होऊन धान पºहे खोदणी व रोवणीच्या कामात लागतात. या कालावधीत मजूर दहा ते बारा हजार रूपयांपर्यंत आर्थिक मिळकत करीत असतात. एकतर मजुरांना रोजगार मिळतो. शिवाय धान रोवणीचेही काम तीव्र गतीने होते.
ट्रॅक्टरद्वारे चिखलणी
चार ते पाच वर्षांपूर्वी ठराविक शेतकरी शेत नांगरणी व चिखलणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करायचे. सर्वसाधारण शेतकरी पारंपरिक लाकडी नांगर व बैैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी व चिखलणी करीत असत. परंतु आता यात बदल झाला आहे. प्रति तास ७५० ते ८०० रूपये प्रमाणे ट्रॅक्टरद्वारे चिखलणी करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Due to contractual mechanism, paddy rozivan can speed up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.