आष्टी तालुका निमिर्तीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:40 AM2019-01-05T00:40:46+5:302019-01-05T00:42:52+5:30

आष्टीला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व पक्षांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आष्टी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. आष्टीपासून चामोर्शीचे अंतर जवळपास ३० किमी आहे.

Demand Movement for Demand for Ashti Taluka | आष्टी तालुका निमिर्तीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

आष्टी तालुका निमिर्तीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन : सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आष्टीला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व पक्षांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आष्टी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. आष्टीपासून चामोर्शीचे अंतर जवळपास ३० किमी आहे. आष्टीच्या पलिकडे १० ते १५ किमी अंतरावर आणखी गावे आहेत. या गावातील नागरिकांना चामोर्शी हे तालुकास्थळ ५० ते ६० किमी पडते. एवढ्या दूर अंतरावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक नागरिक योजनांपासून वंचित आहेत. आष्टी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आष्टीला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. मुलचेरा तालुका घोषित करण्यात आला. आष्टीकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. आष्टीला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
आष्टी येथे पेपरमिल आहे. सदर पेपरमिल बंद पडली आहे. ही पेपरमिल सुरू करून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करावा, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन वित्तमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना दिले जाणार आहे. धरणे आंदोलनात सरपंच वर्षा देशमुख, जि.प. सदस्य रूपाली पंदिलवार, अनखोडाचे सरपंच मंदा चुधरी, चौडमपल्लीचे सरपंच शिला तलांडे, माजी जि.प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, भाजपाचे महामंत्री रवींद्र ओल्लालवार, माजी सरपंच राकेश बेलसरे, काँग्रेसचे जिल्हा महासचिव संजय पंदिलवार, पं.स. सदस्य शिवराम कोसरे, शंकर आक्रेडीवार, सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक विठ्ठल आचेवार, माजी सभापती महेंद्र आत्राम, ग्रा.पं. सदस्य कपील पाल, अविनाश पेदापल्लीवार, सरपंच सुनील करपेत, दिवाकर कुळमेथे, ग्रा.पं. सदस्य विभा देठे, सविता गायकवाड, बेबीताई बुरांडे, सत्यवान भडके, सत्यशील डोर्लीकर, मोहना कुकुडकर, शशी दुर्गे, गिरीधर बामणकर, रवींद्र बामणकर, भास्कर झाडे, अशोक खंडारे, गोसाई गोंगले आदी उपस्थित होते. मागणी मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
 

Web Title: Demand Movement for Demand for Ashti Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.