सिरोंचातील पारंपरिक उर्सवर कोरोनाच्या भीतीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 06:00 AM2020-03-12T06:00:00+5:302020-03-12T06:00:42+5:30

येथे दरवर्षीप्रमाणे १२ ते १४ मार्चदरम्यान हजरत वली हैदरशाह, रहेमतुल्लाह अल्लेह बाबा उर्स जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास कव्वालीचा कार्यक्रम घेण्याचे नियोजनही मस्जिद दर्गाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले, मात्र धार्मिक बाब वगळता अन्य कार्यक्रमांना कोरोनो संसर्गाचा धोका टळेपर्यंत स्थगिती देण्याची सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

Corona's fears over traditional Urs in Sironcha | सिरोंचातील पारंपरिक उर्सवर कोरोनाच्या भीतीचे सावट

सिरोंचातील पारंपरिक उर्सवर कोरोनाच्या भीतीचे सावट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : येथे दरवर्षीप्रमाणे १२ ते १४ मार्चदरम्यान हजरत वली हैदरशाह, रहेमतुल्लाह अल्लेह बाबा उर्स जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास कव्वालीचा कार्यक्रम घेण्याचे नियोजनही मस्जिद दर्गाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले, मात्र धार्मिक बाब वगळता अन्य कार्यक्रमांना कोरोनो संसर्गाचा धोका टळेपर्यंत स्थगिती देण्याची सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून सदर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यामुळे उर्सच्या जत्रेवर कोरोनाच्या भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करुन सिरोंचा येथील उर्स जत्रेच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सदर उर्समध्ये उर्स संदल, कुराण पठण, ध्वज चढविणे इत्यादी आवश्यक धार्मिक बाबी वगळता अन्य कोणतेही कार्यक्रम करता येणार नाही. यात्रा, दुकाने, आकाशपाळणे लावता येणार नाही. स्वागत समारंभ, कव्वाली, अन्नदान यासारखे कार्यक्रम घेता येणार नाही. लोकांच्या जमावामुळे संसर्गाचा धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही याची अध्यक्ष मस्जिद दरगाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटी सिरोंचा यांनी खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
सिरोंचा येथे उर्स जत्रेकरिता येणाºया भाविकांनी खबरदारीचा उपाय म्हणून येथे येऊ नये असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामध्ये शेजारील तेलंगणा, छत्तीसगड राज्य तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रशासनालाही जिल्हा प्रशासनाने याबाबत सूचना दिल्या आहेत.

ट्रस्ट समितीच्या पदाधिकाऱ्यांचा हिरमोड
सिरोंचा येथे दरवर्षी होणाऱ्या या उर्स जत्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणूनही या उर्सकडे पाहिले जाते. गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या राज्यातील सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने येतात. त्याअनुषंगाने मस्जिद दरगाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटी व उर्स आयोजन समितीच्या वतीने महिनाभरापासून तयारी केली जात आहे. त्यामुळे उर्स नेहमीप्रमाणे आयोजित करण्याबाबत ट्रस्ट समितीचे पदाधिकारी आग्रही होते. परंतू तहसीलदार रमेश जसवंत यांनी कोरोनाचे सावट सांगत वेगळी भूमिका घेतली. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी सदर उर्सच्या ठिकाणी लोकांना जाण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. तसेच येथे होणाºया बºयाच कार्यक्रमांना परवानगी नाकारली. त्यामुळे आयोजक समितीच्या पदाधिकाºयांसह भाविकांचा हिरमोड झाला. प्रशासनाच्या या निर्णयावर अनेक पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Corona's fears over traditional Urs in Sironcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.