भामरागड प्रकल्प ठरला क्रीडा संमेलनाचा बाजीगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:13 AM2017-12-26T00:13:47+5:302017-12-26T00:14:23+5:30

आदिवासी विकास नागपूर विभागाच्या तीन दिवशीय क्रीडा संमेलनाचा सोमवारीं समारोप झाला. यात भामरागड प्रकल्पाने विजेते पद प्राप्त केले. विशेष म्हणजे, भामरागड प्रकल्प सलग ११ वेळा विभागीय स्पर्धांचा विजेता ठरला आहे.

Bhamragad project begins | भामरागड प्रकल्प ठरला क्रीडा संमेलनाचा बाजीगर

भामरागड प्रकल्प ठरला क्रीडा संमेलनाचा बाजीगर

Next
ठळक मुद्देदेवरी प्रकल्पाला उपविजेतेपद : सलग ११ वेळा भामरागडची चमू ठरली विजेती; आश्रमशाळांच्या संमेलनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास नागपूर विभागाच्या तीन दिवशीय क्रीडा संमेलनाचा सोमवारीं समारोप झाला. यात भामरागड प्रकल्पाने विजेते पद प्राप्त केले. विशेष म्हणजे, भामरागड प्रकल्प सलग ११ वेळा विभागीय स्पर्धांचा विजेता ठरला आहे. नक्षलग्रस्त भागातील या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या सामन्यांमध्ये देवरी प्रकल्प उपविजेता ठरला आहे.
पारितोषीक वितरण कार्यक्रमाला आमदार डॉ. देवराव होळी, नागपूर विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे, उपआयुक्त सुरेंद्र सावरकर, सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका लता लाटकर, चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावणकर, देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, भंडाराचे प्रकल्प अधिकारी पी. पृथ्वीराज, भामरागडचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे, नागपूरचे पीओ दिगंबर चव्हाण, सहायक आयुक्त दीपक हेडाऊ, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते. क्रीडा संमेलनाचे अहवाल वाचन प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले. संचालन अनिल सोमनकर तर आभार उपआयुक्त सुरेंद्र सावरकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी लेखाधिकारी किशोर वाढ, कार्यालय अधीक्षक डी. के. टिंगुसले, सहायक प्रकल्प अधिकारी ए. आर. शिवणकर, आर. के. लाडे, डब्ल्यू. टी. राऊत, छाया घुटके, क्रीडा अधिकारी मदन टापरे, क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर, सुधाकर गौरकार, सुधीर शेंडे, विनोद कुलकर्णी, व्ही. वाय. भिवगडे, जे. एन. नैताम, डब्ल्यू. के. कोडाप, नोडल अधिकारी आर. टी. निंबोडकर, डी. व्ही. विरूटकर, सुभाष लांडे, संदीप भोयर, भास्कर मदनकर यांनी सहकार्य केले.
गडचिरोली प्रकल्प तिसरा
गडचिरोली येथील क्रीडा संमेलनाचे आयोजन प्रथमच राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या दर्जाप्रमाणे होते. या स्पर्धेत गडचिरोली प्रकल्पाने तिसरे स्थान पटकाविले. भामरागड हा अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त तालुका असतानाही येथील विद्यार्थ्यांनी सलग ११ वेळा विजेतेपद पटकाविल्याने मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

Web Title: Bhamragad project begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.