आष्टीत व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न फसला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 01:19 AM2018-10-04T01:19:00+5:302018-10-04T01:20:35+5:30

शहरात आलापल्ली मार्गावर दुकान बंद करून दुचाकीने जात असलेल्या व्यापाºयास लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल २ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ निर्माण झाली आहे.

The attempt to loot the businessman was unsuccessful | आष्टीत व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न फसला 

आष्टीत व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न फसला 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : शहरात आलापल्ली मार्गावर दुकान बंद करून दुचाकीने जात असलेल्या व्यापाºयास लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल २ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ निर्माण झाली आहे.  
 येथील अनिल पान मटेरियलचे मालक श्रीनिवास राघमवार हे आपले दुकान बंद  करून नेहमीप्रमाणे गोडाऊनकडे जात असताना रात्री ८.३०  वाजता आलापल्ली मार्गावरील ग्रामीण रुग्णालयासमोर दबा धरून बसलेल्या दोन हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनी त्यांच्या दुचाकिला मागून ठोस मारली.  त्यामुळे राघमवार यांनी कोण आहे म्हणून मागे फिरले असता त्यांची पैशाची बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न आरोपी करू लागले. तसेच एकाने तोंडावर स्प्रे मारला.  त्यामुळे राघमवार यांना इजा झाली. ते वेदनेने खाली पडले आणि जोरात ओरडू लागले. त्यानंतर आरोपी आलापल्ली मार्गाने पळून गेले. यावेळी काही नागरिकांनी पाठलाग केला पण ते  सापडले नाही.  त्यांच्या दुचाकीच्या नंबर प्लेटला पट्टी चिटकवून होती.  त्यामुळे नंबर सुध्दा मिळू शकला नाही.  श्रीनिवास राघमवार याना तत्काळ उपचारासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. राघमवार यांनी दाखविलेल्या हिमतीमुळे मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे आष्टी मधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.

Web Title: The attempt to loot the businessman was unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.