यावर्षी १ कोटी ९ लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:17 AM2019-05-11T00:17:38+5:302019-05-11T00:17:59+5:30

येत्या पावसाळ्यात राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १ कोटी ९ लाख रोपट्यांच्या लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यासाठी वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग जोमाने तयारीला लागला आहे. दोन्ही विभाग मिळून ८२ हजार रोपे तयार आहेत.

Aim of 1 crore 9 lakh plantation this year | यावर्षी १ कोटी ९ लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

यावर्षी १ कोटी ९ लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

Next
ठळक मुद्दे८२ लाख रोपटे तयार : सागवानासह विविध फळ आणि फुलझाडांच्या रोपट्यांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येत्या पावसाळ्यात राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १ कोटी ९ लाख रोपट्यांच्या लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यासाठी वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग जोमाने तयारीला लागला आहे. दोन्ही विभाग मिळून ८२ हजार रोपे तयार आहेत. आणखी काही रोपांची निर्मिती केली जाणार आहे.
येत्या १ जुलैपासून शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत रोपट्यांची लागवड सुरू होणार आहे. १ कोटी ९ लाखांच्या उद्दीष्टापैकी सर्वाधिक ५७ लाख रोपटे लागवडीचे उद्दिष्ट वनविभागाला आहे. महाराष्टÑ वनविकास महामंडळाला २४ लाख ७४ हजार, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १४ लाख ५९ हजार, सामाजिक वनीकरण विभागाला ६ लाख तर शासनाच्या इतर विभागांना ७ लाख २६ हजार वृक्षारोपण करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.
सदर वृक्षारोपण मोहिमेसाठी ग्रामपंचायतींना मोफत रोपे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे रोपे ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचवून देण्याचा खर्चही वनविभाग करणार आहे. यावर्षी वृक्षारोपण केल्या जाणाऱ्या भागाला तारांचे कुंपण लावले जाणार आहे. त्यामुळे खर्चात ४ ते ५ पटींनी वाढ झाली आहे. सध्या वृक्षारोपणासाठी वनविभागाकडे जवळपास ७५ लाख रोपे तर सामाजिक वनीकरण विभागाकडे ७ लाख ४० हजार रोपे तयार आहेत. त्यात सागवान, जांभूळ, सीताफळ, बांबू, फणस, गुलमोहर, पेरू, निलगिरी अशा रोपट्यांचा समावेश आहे. रोपे तयार करण्याची सुरूवात नोव्हेंबर महिन्यातच होते. त्यामुळे कोणत्या विभागाला कोणत्या झाडांची रोपे हवी त्याची मागणी तेव्हाच कळली तर तशी रोपे तयार करणे शक्य होते, पण ती माहिती आधी कळविली जात नसल्याची खंत विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

नैसर्गिकरीत्या उगवणाºया ३६ लाख झाडांचे संगोपन करणार
वनविभागाला यावर्षी ५७ लाख रोपटे लागवडीचे उद्दिष्ट असले तरी या विभागाकडे तेवढी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे प्रत्यक्षात ३० लाख खड्डे करून रोपटे लावली जातील. उद्दिष्टातील उर्वरित २७ लाख झाडे नैसर्गिकरीत्या उगवणाºया रोपट्यांच्या संगोपनातून विकसित केली जाणार आहेत. वनविकास महामंडळाला २३.७४ लाख रोपटे लागवडीचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १५ ते १६ लाख खड्डे केले जाणार असून उर्वरित झाडे नैसर्गिकरित्या उगवणाºया रोपट्यांमधील विकसित केली जाणार आहेत. त्यामुळे वृक्षारोपणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्यक्षात ७३ लाख रोपांचीच गरज भासणार आहे.

Web Title: Aim of 1 crore 9 lakh plantation this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.