दुखण्याने त्रस्त ४२ नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:17 PM2019-03-11T22:17:12+5:302019-03-11T22:17:36+5:30

शरीरातील एखाद्या भागात होत असलेल्या दीर्घकालीन वेदनेवर उपचारासाठी सर्च येथील माँ दंतेश्वरी धर्मदाय दवाखान्यात एक दिवसीय वेदनाशमन शिबीर घेण्यात आले. यामध्ये ४२ रुग्णांची तपासणी करून यातील आठ जणांवर या पद्धती अंतर्गत उपचार करण्यात आले.

42 inspecting people suffering from pain | दुखण्याने त्रस्त ४२ नागरिकांची तपासणी

दुखण्याने त्रस्त ४२ नागरिकांची तपासणी

Next
ठळक मुद्देसर्चचा उपक्रम : मुंबई येथील तज्ज्ञांकडून करण्यात आले उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : शरीरातील एखाद्या भागात होत असलेल्या दीर्घकालीन वेदनेवर उपचारासाठी सर्च येथील माँ दंतेश्वरी धर्मदाय दवाखान्यात एक दिवसीय वेदनाशमन शिबीर घेण्यात आले. यामध्ये ४२ रुग्णांची तपासणी करून यातील आठ जणांवर या पद्धती अंतर्गत उपचार करण्यात आले.
शरीराच्या एखाद्या भागावर ताण पडल्यास तो काही कालावधीकरिता दुखणे ही सामान्य बाब आहे. औषधोपचाराने काहीच दिवसात यापासून आराम मिळतो. पण वर्षानुवर्ष एकाच प्रकारच्या दुखण्याने काही जण त्रस्त असतात. औषध घेऊनही पाहिजे तसा फायदा होत नाही. त्यामुळे हे दुखणे त्यांचे रोजचे जगणे बाधित करते. परिणामी चालताना, बसताना प्रचंड यातना होतात. दुखण्याने झोप येत नाही. रोजची कामे करता येत नाही. अशा प्रकारच्या दुखण्यावर इलाज करणे आवश्यक ठरते. कंबर, मान, डोके, सांधे, गुडघे येथील दुखण्याचा यात समावेश असतो. सर्च मध्ये उपचारासाठी आलेल्या काही रुग्णांना अशा प्रकारचे दीर्घकालीन दुखणे असल्याचे लक्षात घेत ९ मार्च रोजी पेन क्लिनिक घेण्यात आले. यात एकूण ४२ रुग्णांची तपासणी करून त्यातील आठ रुग्णांवर या पद्धती अंतर्गत उपचार करण्यात आले. मुंबईतील पेन स्पेशालिस्ट डॉ. जितेंद्र जैन, डॉ. शाहनवाज आणि सर्च दवाखान्यात भूलतज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. शिल्पा मलिक यांनी रुग्णांवर उपचार केले. अनेकांना दीर्घकालीन दुखण्याचा त्रास असतो. अशा रुग्णांनी सर्च मध्ये येऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. आगामी काळात होणाऱ्या वेदनाशमन शिबिराची तारीख त्यांना सांगितली जाणार आहे.
पेन क्लिनिक उपचारपद्धती
दीर्घकालीन वेदनेने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही उपचारपद्धती उपयोगात आणली जाते. जास्त दुखणे असलेल्या भागाची तपासणी करून त्या भागावर किंवा दु:खाची सुरुवात असलेल्या जागेवर वेदनाशमन इंजेक्शन दिल्या जाते. तपासणी केल्यावर औषधोपचाराने दुखणे थांबणार नाही हे तपासूनच इंजेक्शन दिले जाते.

Web Title: 42 inspecting people suffering from pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.