३१ हजार हेक्टरचे वनक्षेत्र स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 10:59 PM2018-04-04T22:59:48+5:302018-04-04T22:59:48+5:30

राज्यातील एकूण वन क्षेत्रापैैकी निम्म्याहून अधिक जंगल पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात आहे. राज्यभरातील जंगलांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढले असल्याने राज्यातील ३१ हजार ८७६ हेक्टर वनक्षेत्र आगीत स्वाहा झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.

31 thousand hectares of forest area | ३१ हजार हेक्टरचे वनक्षेत्र स्वाहा

३१ हजार हेक्टरचे वनक्षेत्र स्वाहा

Next
ठळक मुद्देआगीत जंगलाची राखरांगोळी : विभागीय आयुक्त व मुख्य वनसंरक्षकांच्या समितीचा बोजवारा

प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : राज्यातील एकूण वन क्षेत्रापैैकी निम्म्याहून अधिक जंगल पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात आहे. राज्यभरातील जंगलांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढले असल्याने राज्यातील ३१ हजार ८७६ हेक्टर वनक्षेत्र आगीत स्वाहा झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.
जिल्ह्यातील घनदाट जंगल पानझडीचा असल्याने मार्च महिन्याच्या प्रारंभापासून या जंगलांना मोठ्या प्रमाणात वनवे लागतात. मात्र हे वनवे रोखण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. त्यामुळे वनाधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
उन्हाळ्यात जंगलांना लागणाऱ्या आगी या राष्टÑीय संपत्ती म्हणून केंद्र शासनाने जाहीर केले आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्रास लागणाºया वनव्याच्या नियोजनासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. यामध्ये विभागीय आयुक्त व मुख्य वनसंरक्षकांचाही समावेश आहे. हजारो हेक्टर जंगल क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून कोट्यवधी रूपयांची वनसंपत्ती नष्ट झाली आहे. मात्र वनव्यावर नियंत्रण आणण्यासाठी विभागीय आयुक्त, मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक यांच्याकडून कोणतीही उपाययोजना केल्या गेली नाही. गेल्या वर्षात राज्यभरात जवळपास २५ हजार हेक्टर वनक्षेत्र आगीत जळून खाक झाले. त्यानंतरही वन विभाग व प्रशासन जागे झाले नाही. वन विभागाकडे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा वापर करून वनव्यावर नियंत्रण आणण्यात आले नाही. जिल्ह्यात वनव्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मात्र वनाधिकारी उपाययोजना करून उदासीन असल्याचे दिसून येते. आरमोरी तालुक्याच्या रामाळा बिटातील रोपवन आगीत जळून खाक झाले. असे असले तरी वनवे विझविणाºया मजुरांचे हजारो रूपयांचे बिल मंजूर केले जात आहेत.

Web Title: 31 thousand hectares of forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.