एका एकरात ३० क्विंटल मिरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:52 AM2019-03-07T00:52:56+5:302019-03-07T00:53:35+5:30

तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. या तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानपिकासोबतच भाजीपाला पिकाकडे वळले आहे. तालुक्याच्या एकोडी येथील एका शेतकºयाने आपल्या एक एकरच्या शेतात मिरची पिकाची लागवड केली.

30 quintals of pepper per acre | एका एकरात ३० क्विंटल मिरची

एका एकरात ३० क्विंटल मिरची

Next
ठळक मुद्देएकोडीतील शेतकऱ्याची यशोगाथा : दीड लाखांचे उत्पन्न मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. या तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानपिकासोबतच भाजीपाला पिकाकडे वळले आहे. तालुक्याच्या एकोडी येथील एका शेतकºयाने आपल्या एक एकरच्या शेतात मिरची पिकाची लागवड केली. त्या मिरच्या आता निघण्यास सुरूवात झाली असून एका एकरातून ३० क्विंटल मिरचीचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यातून त्यांना दीड लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे.
तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर वैनगंगा नदीशेजारी एकोडी हे खेडेगाव आहे. येथील शेतकरी रवी धोटे यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. धोटे यांना लहानपणापासून शेती कामाची आवड निर्माण झाली. वडीलोपार्जीत शेतजमिनीत दरवर्षी नवनवीन प्रयोग आपल्या कल्पनेतून करण्याचे धाडस ते दाखवितात. यावर्षी धोटे यांनी आपल्या एक एकरात मिरची पिकाची लागवड केली. यासाठी त्यांना ३० हजार रुपयांचा खर्च आला. मिरची पिकाची चांगली देखभाल करून काळजी घेतल्यामुळे जवळपास ३० क्विंटल उत्पादन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. धोटे यांच्या शेतातील मिरची पीक आता तोडणीला आले आहे. ३० क्विंटल मिरची विक्रीतून जवळपास १ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न धोटे यांना मिळणार आहे. दिवसेंदिवस युवा पिढी शेती व्यवसायाकडे पाठ फिरवित आहे. मात्र काही मोजके सुशिक्षित युवा शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करीत आहे. यामध्ये रवी धोटे हे एक आहेत. शेतकºयांनी धानपिकासोबतच विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाची शेती केल्यास शेती व्यवसाय फायदेशिर ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.

Web Title: 30 quintals of pepper per acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी