फास्टफुड सेंटर की... कुत्र्यांचं पॉवर नॅप पॉर्इंट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 15:01 IST2017-07-27T14:58:12+5:302017-07-27T15:01:16+5:30

सातारा : नजरेआड सृष्टी किंवा अज्ञानात सुख असते या म्हणींचा प्रत्यय राजवाडा चौपाटी बंद असताना घेता येतो. मुंबई चौपाटीच्या धर्तीवर सुरू झालेले हे फास्टफुड सेंटर दिवसा अन्न पदार्थ करायला आणि रात्री कुत्र्यांना झोपायला हक्काचे ठिकाण ठरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

satara, fast, food, center, dogs, house, | फास्टफुड सेंटर की... कुत्र्यांचं पॉवर नॅप पॉर्इंट!

दिवसभर पोटाची भूक भागविण्यासाठी ज्या हातगाड्यांवर अन्न तयार केले जाते... चक्क त्याच ठिकाणावर रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री विश्रा

ठळक मुद्देमोकाट जनावरांचा त्रास रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री विश्रांती घेत असल्याचे वास्तव उपाययोजना करून हातगाडी चालक आले जेरीस


सातारा : नजरेआड सृष्टी किंवा अज्ञानात सुख असते या म्हणींचा प्रत्यय राजवाडा चौपाटी बंद असताना घेता येतो. मुंबई चौपाटीच्या धर्तीवर सुरू झालेले हे फास्टफुड सेंटर दिवसा अन्न पदार्थ करायला आणि रात्री कुत्र्यांना झोपायला हक्काचे ठिकाण ठरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

सातारा राजवाडा चौपाटीवर कोणी गेला नाही असे नाही... राजा असो वा रंक संध्याकाळच्यावेळी येथील विविध पदार्थांच्या वासाच्या दरवळीने चौपाटीकडे ओढल्या जाणाºयांची संख्याही मोठी आहे.

वडा पावपासून शोरमा पर्यंत जवळपास सर्वच पदार्थ येथे मिळत असल्याने विविध आर्थिक स्तरातील लोकांचा येथे राबता असतो. दिवसभरात सुमारे दीड हजार लोकांची येथे वर्दळ असते. उत्सव आणि सणाच्या कालावधीत ही गर्दी दिप्पटीने वाढते. सातारकरांची अन्नपूर्णा म्हणून ओळख असणाºया या चौपाटीत स्वच्छतेचे मात्र तिन तेरा झाले आहेत.

चौपाटी सुरू असताना येथे मोठी वर्दळ असते पण रात्री अकराच्या आसपास चौपाटी बंद झाल्यानंतरचे चित्र खुपच विदारक आणि भितीदायक आहे. हायजिन कॉन्शीयस असणाºयांच्या पायाखालची कदाचित जमिनच सरकेल!

दिवसभर पोटाची भूक भागविण्यासाठी ज्या हातगाड्यांवर अन्न तयार केले जाते... चक्क त्याच ठिकाणावर रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री विश्रांती घेत असल्याचे वास्तव आता पुढे आले आहे.

Web Title: satara, fast, food, center, dogs, house,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.