हटके स्टाइलने तयार करा लखनवी वांग्याचे काप!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 04:23 PM2019-01-28T16:23:21+5:302019-01-28T16:28:04+5:30

अनेकदा घरातल्यांना खाऊ घालण्यासाठी तुम्ही हटके रेसिपी शोधत असाल. सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वांगी दिसून येतात. अशातच घराघरांमध्ये वांग्याचं भरीत.

Receipe of Lucknow brinjal masala slice or vangyache masala kaap | हटके स्टाइलने तयार करा लखनवी वांग्याचे काप!

हटके स्टाइलने तयार करा लखनवी वांग्याचे काप!

Next

अनेकदा घरातल्यांना खाऊ घालण्यासाठी तुम्ही हटके रेसिपी शोधत असाल. सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वांगी दिसून येतात. अशातच घराघरांमध्ये वांग्याचं भरीत. वांग्याची भाजी यांसारखे पदार्थ तयार करण्यात येतात. यापेक्षा थोडा हटके पदार्थ तयार करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही लखनवी स्टाइलने वांग्याचे काप तयार करू शकता. हे काप करण्यासाठी अगदी सोपे आणि खाण्यासाठी अत्यंत रूचकर लागतात. पाहूयात ही हटके रेसिपी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती...

साहित्य : 

  • दोन मोठी वांगी
  • बेसन पीठ
  • आलं-लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • हळद
  • मसाला 
  • मीठ चवीनुसार

 

कृती : 

- दोन मोठ्या वांग्याची कापं करून घ्या. 

- आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, थोडा मसाला, चवीनुसार मीठा मिश्रणात एकजीव करा. 

- मिश्रणात थोडसं बेसन पीठ टाका. 

- सगळे काप तेलात परतून घ्या.

-  त्यानंतर तव्यावर जे तेल उरेल, त्या तेलात ओल्या नारळाचं किसलेलं खोबरं, आलं-लसूण पेस्ट घाला, पुन्हा परतून घ्या. 

- तयार मसाल्यामध्ये वांग्याचे तयार केलेले काप घाला.

- गरम गरम लखनवी वांग्याचे काप तयार आहेत. 

Web Title: Receipe of Lucknow brinjal masala slice or vangyache masala kaap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.