कॉफी एकदम फेव्हरिट आहे ना मग हे माहित आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 05:55 PM2017-10-25T17:55:28+5:302017-10-25T18:05:31+5:30

कॉफी हे ग्लॅमर लाभलेलं पेय असलं तरी ते सर्वसामान्यांनाही परवडतं. गरम, क्रि मी कॉफीचा एक सिप आपला मूड फ्रेश करतो.अशा या कॉफीचं जग खूप मोठं आहे. कॉफीप्रेमींना किमान कॉफीचे लोकप्रिय प्रकार आणि पध्दत  याविषयी माहिती असायलाच हवी.

No doubt you like coffee but are you familiar with coffee world? | कॉफी एकदम फेव्हरिट आहे ना मग हे माहित आहे का?

कॉफी एकदम फेव्हरिट आहे ना मग हे माहित आहे का?

Next
ठळक मुद्दे* अमेरिकानो हा कॉफीचा प्रकार आणि चव म्हणजेच कॉफी शॉट. दूधाचा वापर न करता उकळत्या पाण्यात कॉफी पावडर टाकून अमेरिकानो तयार होते.* कापूकिनो हा कॉफीचा इटालियन अवतार आहे. डबल एस्सप्रेसो कॉफी वापरून तो तयार केला जातो. कॉफी तयार झाल्यावर वरून जाड दुधाच्या फेसाची लेयर चढवली जाते. या फेसावर मग अप्रतिम चित्रं देखील साकारली जातात.* फिल्टर कॉफी हा भारतातील सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. दक्षिण भारतातच या कॉफीचा उगम झाला. ही कॉफी बनवण्यासाठी विशिष्ट प्रकारचं फिल्टर वापरलं जातं. हे फिल्टर दोन-तीन कप कॉफी तयार करणारं मिनी फिल्टर असतं.

- सारिका पूरकर-गुजराथी


कामाचा प्रचंड ताण, आॅफिसमध्ये नुसती धावपळ आहे, जेवायलाही वेळ नाहीये, बाहेर मुसळधार पाऊस कोसळतोय, हुडहुडी भरवणारी थंडी पडलीये, छान वाटतय नाहीतर बोअर होतंय असं कोणतंही कारण कॉफी प्यायला पुरतं. कॉफी या एका पेयाला आॅल टाइम फेवरिट ड्रिंक्सच्या यादीत चहाच्या बरोबरीचं स्थान आहे. निवांत गप्पांसाठी, आॅफिसच्या मीटिंग्जसाठी, पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी तसेच एखाद्या विचारवंताच्या लेखनासाठी कॉफीचा कप हवाच हवा..तर कॉफी हे ग्लॅमर लाभलेलं पेय असलं तरी ते सर्वसामान्यांनाही परवडतं. गरम, क्रि मी कॉफीचा एक सिप आपला मूड फ्रेश करतो.अशा या कॉफीचं जग खूप मोठं आहे. कॉफीप्रेमींना किमान कॉफीचे लोकप्रिय प्रकार आणि पध्दत तरी माहिती असायलाच हवी.
भारतात 16 व्या शतकापासून कॉफीचं उत्पादन होत आहे. मुस्लिम संत बाबा बुदान यांनी येमेन येथून कॉफी भारतात आणली होती.त्यानंतर व्यावसायिकदृष्ट्या कॉफीची लागवड 18 व्या शतकात सुरु झाली. ब्रिटिशांना याचं श्रेय द्यावं लागेल. त्यांनी भारतात कॉफी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले. आज जागतिक पातळीवरील भारतीय कॉफी इंडस्ट्रीनं एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तसेच खूप मोठा लौकिक मिळवला आहे. भारतात 13 जिल्ह्यांमध्ये कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. विशेष करु न दक्षिण भारतात कॉफीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. शिवाय भारतात जेथे जेथे कॉफी उत्पादन होतं त्या प्रदेशांचा समावेश जगभरातील जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या पहिल्या 25 प्रदेशांमध्ये होतो. 1950 नंतर भारतात कॉफी उत्पादनात प्रचंड वेग आला. 1950-51 भारतात 18,893 टन कॉफी उत्पादन होत होते आणि आज भारत जगातील सर्वात जास्त कॉफी उत्पादक देश म्हणून विक्र म रचण्याच्या मार्गावर आहे. सध्या भारतात 3,55,600 टन इतक्या प्रचंड प्रमाणात कॉफीचं उत्पादन होतं. अरेबिका, रोबोस्टा हे भारतीय कॉफीचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

कॉफीचे प्रकार

आपण जरी फिल्टर कॉफी, एस्सप्रेसो कॉफी या दोन नावांनीच, चवींनीच कॉफीला ओळखत असलो तरी कॉफीचे असंख्य प्रकार भारतात आणि जगभरात पाहायला मिळतात. कॉफीचे प्रकार, या चवी कॉफी बियांच्या विविधतेनुसार आढळून येतात. दक्षिण भारतातील नागरिकांच्या न्याहाराची प्रमुख संकल्पना पूर्वी कॉफी या पेयाभोवतीच फिरत होती. दूध आणि कॉफीचं हे मिश्रण तेथूनच पुढे कॉफी नावानं भारतात लोकप्रिय झालं. कॉफीचे प्रकार हे एस्सप्रेसो वरून ठरतात. म्हणजेच उकळत्या पाण्यात कॉफी टाकून निर्माण होणा-या वासावरून, चवीवरून, रंगावरून तसेच त्यावर येणा-या फेसावरु न ठरतात. आंबट, चॉकलेटी, फळांची तसेच क्रिमची चव या कॉफी बियांमध्ये आढळते. या एस्सप्रेसोचे प्रमुख डार्क बेली, लाइटर मिडल लेयर आणि क्रिमा असे तीन प्रकार आहेत. मग या तीनही प्रकारात पुन्हा जगभरात कॉफी बियांचे विविध प्रकार उत्पादित होतात.

 

 

1) अमेरिकानो :- कॉफीचा हा प्रकार आणि चव म्हणजेच कॉफी शॉट. दूधाचा वापर न करता उकळत्या पाण्यात कॉफी पावडर टाकून अमेरिकानो तयार होते.
 

2) लाट्टे :- फेसाळलेलं दूध आणि कॉफी यांचं हे कॉम्बिनेशन आहे. अमेरिकन स्टाइलची ही कॉफी आहे. दूध गरम करून ते चांगलं घुसळून त्याचा फेस काढून घेतला जातो. हा फेस आणि एस्सप्रेसो कॉफी एकत्र करु न ही कॉफी तयार केली जाते. अमेरिकेत दूधापासून फेस काढण्यासाठी विविध अप्लायन्सेस उपलब्ध आहेत. परंतु, भारतात बीटर किंवा आपली अगदी साधी ताक घुसळायची रवी देखील हे काम करु शकते.
 

3)कॅफे मोचा :- येमेन येथे या कॉफीचा उगम झाला. तेथील मोचा शहरावरूनच कॉफीला हे नाव देण्यात आलं. कॉफीचा हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. लाट्टे कॉफीचे पुढचे पण अगदी रिच व्हर्जन आहे हे. या प्रकारात कोको पावडर वापरून चॉकलेट फ्लेवर दिला जातो शिवाय कॉफीवर घट्ट फेसलेली भरपूर क्र ीम घातली जाते.

 

4) कापूकिनो :- कॉफीचा हा इटालियन अवतार आहे. डबल एस्सप्रेसो कॉफी वापरून तो तयार केला जातो. कॉफी तयार झाल्यावर वरून जाड दुधाच्या फेसाची लेयर चढवली जाते. या फेसावर मग अप्रतिम चित्रं देखील साकारली जातात.
5) फ्रॅपे :- ग्रीकमधील हे लोकप्रिय पेय आहे. कोल्ड कॉफी देखील आपण तिला म्हणू शकतो. कोल्ड कॉफीला शेक करून क्रि मी बनवले जाते .

 

6) माचिआटो :- लेयर्ड कॉफी असे याचं सोपं नाव आहे. फेसाळलेलं दूध आणि एस्सप्रेसोचाच वापर यातही केला जातो. परंतु, जास्त फेसाळलेले, क्रि मी असे याचे स्वरूप असते. शिवाय तीन लेयरमध्ये ही कॉफी सर्व्ह केली जाते. कॉफीच्या या बेसिक प्रकारांवरु न जगभरात अनेक प्रकार पाहायला मिळतात.

7) फिल्टर कॉफी :- हा भारतातील सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. दक्षिण भारतातच या कॉफीचा उगम झाला. ही कॉफी बनवण्यासाठी विशिष्ट प्रकारचं फिल्टर वापरलं जातं. हे फिल्टर दोन-तीन कप कॉफी तयार करणारं मिनी फिल्टर असतं. या फिल्टरमधील जाळीच्या भांड्यात कॉफी पावडर घालून त्यावर पुन्हा जाळीचंच झाकण असलेला स्टॅण्ड असतो. ते घट्ट लावलं जातं. यावर उकळतं पाणी ओतलं की कॉफ विरघळून त्याचं मिश्रण खालच्या भांड्यात फिल्टर होऊन जमा होतं. मग हे कॉफीचं मिश्रण, गरम दूध, चवीनुसार साखर घालून दोन भांड्यात वर खाली करु न फेसाळून घेतलं की तयार होते फिल्टर कॉफी. फिल्टर कॉफीबरोबरच भारतात आता कॉफीचा वापर मॉकटेल्स, कॉकटेल्स, कुकीज, केक, स्मुदीज, डेझर्टसमध्येही केला जात आहे.

 

Web Title: No doubt you like coffee but are you familiar with coffee world?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.