वजन कमी करण्यासाठी आंबा आणि दह्याचे एकत्र करा सेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 05:02 PM2019-05-16T17:02:10+5:302019-05-16T17:05:12+5:30

हैराण करणाऱ्या उकाड्यामुळे उन्हाळा नकोसा वाटला तरिही आंब्यांच्या सीझनमुळे तो हवाहवासादेखील वाटतो. आंबा चवीला उत्तम असतोच, पण तो आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो.

Lifestyle eat mango and curd together to lose weight | वजन कमी करण्यासाठी आंबा आणि दह्याचे एकत्र करा सेवन

वजन कमी करण्यासाठी आंबा आणि दह्याचे एकत्र करा सेवन

googlenewsNext

हैराण करणाऱ्या उकाड्यामुळे उन्हाळा नकोसा वाटला तरिही आंब्यांच्या सीझनमुळे तो हवाहवासादेखील वाटतो. आंबा चवीला उत्तम असतोच, पण तो आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए व्यतिरिक्त सायट्रिक अ‍ॅसिड, सल्फाइड, आयर्न आणि फायबरही मुबलक प्रमाणात आढळून येतात. ज्यामुळे आंब खाल्यानंतर बराचवेळ पोट भरल्यापसारखं वाटतं आणि लगेच भूक लागत नाही. आंबा फॅट फ्री, कोलेस्ट्रॉल फ्री आणि सॉल्ट फ्री असतो. त्यामुळे जर दररोज आंबा खात असाल तर तुमचं वजन वाढणार नाही. परंतु जर तुम्हाला 1 ते 2 महिन्यात वजन कमी करण्याची इच्छा असेल तर, आंब्यासोबत दही खाण्यास सुरुवात करा. 

(Image Credit : StyleCraze)

आवश्यक पोषक तत्व 

दही आणि आंबा एकत्र खाल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात. जर तुम्ही नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात आंबा आणि दही खात असाल तर वजन कमी होण्यास मदत होईल. 

इतर कोणताही पदार्थ खाणं टाळा

लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दही आणि आंबा खाता, तेव्हा त्याच्यासोबत इतर कोणतंही धान्य खाऊ नका. कारण त्यामुळे तुमचा डाएट प्लॅन पूर्णपणे बिगडू शकतो. तसेच पाणी पिणं गरजेचं आहे. दही आणि आंब्याच्या डाएटसोबत 3-4 लीटर पाणी पिणं गरजेचं आहे. 

(Image Credit : hindi.boldsky.com)

पचनक्रिया सुधारण्यास मदत

आंब्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं आणि जेव्हा हे दह्यासोबत एकत्र होतं त्यावेळी पचनक्रिया सुधारते. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी यांसारखी पोषक तत्व असतात. जी डायजेशनसाठी बेस्ट ठरतात. 

चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर

आंबा खाल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढत. आंब्याच्या कोयीमध्ये असलेले रेशा आणि फॅट्स शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. आंब्यामध्य लेप्टिन केमिकल असतं, ज्यामुळे भूक कमी लागते. 

(Image Credit : Good Chef Bad Chef)

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं. 

Web Title: Lifestyle eat mango and curd together to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.