आठवड्यातून एकदा तरी 'हे' आरोग्यदायी सूप नक्की ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 06:00 PM2018-09-29T18:00:50+5:302018-09-29T18:04:10+5:30

किडनी बीन्स म्हणजेचं राजमा. उत्तर भारतामध्ये राजमपासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात येतात. मेक्सिकन डिशेसमध्येही याचा मोठा प्रमाणावर वापर करण्यात येतो.

how to make healthy rajma soup | आठवड्यातून एकदा तरी 'हे' आरोग्यदायी सूप नक्की ट्राय करा!

आठवड्यातून एकदा तरी 'हे' आरोग्यदायी सूप नक्की ट्राय करा!

googlenewsNext

किडनी बीन्स म्हणजेचं राजमा. उत्तर भारतामध्ये राजमपासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात येतात. मेक्सिकन डिशेसमध्येही याचा मोठा प्रमाणावर वापर करण्यात येतो. राजमामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न, मॅग्नेशिअम आणि फायबर असतं. परंतु राजमा व्यवस्थित तयार केला नाही तर पोटाच्या तक्रारींना सामोरं जावं लागू शकतं. आज जाणून घेऊयात राजमाचं सूप तयार करण्याची एक खास पद्धत...

राजमा सूप तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य - 

  • एक कप राजमा
  • कोथिंबीर 
  • कांद्याची पात
  • आलं
  • टॉमेटो, गाजर, बीट आणि लसूण 
  • तूप
  • काळी मिरी पावडर

 

राजमा सूप तयार करण्याची कृती :

1. राजमा सूप तयार करण्यासाठी रात्री राजमा पाण्यामध्ये भिजत ठेवा. 

2. सकाळी कुकरमध्ये शिजवून घ्या. 

3. आता टॉमेटो, गाजर, बीट, कांदा, फरसबी आणि लसणाचे छोटे छोटे तुकडे करा. 

4. कढईमध्ये थोडं तूप टाकून गरम करून घ्या आणि सगळ्या भाज्या शिजवून घ्या. 

5. भाज्या शिजल्यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेला राजमा एकत्र करा. 

6. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्या. 

7. त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने मिश्रण बारिक करून घ्या. 

8. एका कढईमध्ये गरम पाण्यासोबत बारिक केलेलं मिश्रण उकळी येईपर्यंत शिजवून घ्या. 

9. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर, कांद्याची पात, आलं टाका.

10. उकळी आल्यानंतर वरून काळी मिरीची पूड टाकून सूप सर्व्ह करा. 

Web Title: how to make healthy rajma soup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.