ओठांवर खुलून दिसणारे लिपस्टिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2016 03:15 PM2016-03-16T15:15:07+5:302016-03-16T08:19:11+5:30

लिपस्टिक निवडताना तुम्हाला असा रंग मिळेल जो तुमच्या चेहºयावर आणि ओठांवर खुलून दिसेल.

Lipstick that appears on the lips | ओठांवर खुलून दिसणारे लिपस्टिक

ओठांवर खुलून दिसणारे लिपस्टिक

Next
रतीय महिलांना लिपस्टिक विकत घेताना त्या डस्की स्कीनटोनसाठी आहेत का हे पाहून मगच त्या विकत घ्या किंवा अशा ब्रँडना प्राधान्य द्या जे खास करून भारतीय महिलांसाठी लिपस्टिक तयार करतात. असे केल्यामुळे लिपस्टिक निवडताना तुम्हाला असा रंग मिळेल जो तुमच्या चेहºयावर आणि ओठांवर खुलून दिसेल.

अनेक जणी लिपस्टिकचा रंग निवडताना ती लिपस्टिक हाताच्या मागच्या बाजूला लावतात आणि हा रंग आपल्यावर चांगला दिसेल की नाही हे ठरवतात. पण असं करणं चुकीचं आहे. रंग निवडताना तो बोटांवर लावून पाहावा, कारण हाताच्या बोटांचा रंग आणि ओठांचा रंग किंचित मिळता जुळता असतो. शक्यतो आपल्या रंगापेक्षा दोन शेड्स गडद निवडाव्यात.

भारतीय महिलांचा स्कीनटोन हा डस्की आहे, त्यामुळे लिपस्टिक निवडताना कॉपर, ब्राँझ, ब्राऊन बेरी अशा शेड्सना प्राधान्य द्यावे. लिपस्टिक लावल्याने चेहरा खुलून दिसायला हवा. 

Web Title: Lipstick that appears on the lips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.