Fashion : ​स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात आपण जास्त पैसे तर खर्च करीत नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 06:31 AM2017-08-18T06:31:04+5:302017-08-18T12:01:04+5:30

जाणून घेऊया की, स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात आपण कोणत्या चुका करतो...!

Fashion: You do not spend much money in trying to look stylish, do not you? | Fashion : ​स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात आपण जास्त पैसे तर खर्च करीत नाही ना?

Fashion : ​स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात आपण जास्त पैसे तर खर्च करीत नाही ना?

Next
णही सेलिब्रिटींसारखे स्टायलिश दिसावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी बरेच लोक स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात खूप महागडे कपडे खरेदी करतात. प्रत्येकवेळी स्टायलिश दिसण्यासाठी महागडे कपडेच खरेदी करावे याची आवश्यकत नसते. जाणून घेऊया की, स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात आपण कोणत्या चुका करतो...

* विना नियोजन शॉपिंग 
बऱ्याचजणांना विना नियोजन शॉपिंग करण्याची सवय असते. मार्केटमध्ये जातात वेगळ्या कामासाठी आणि कपडे दिसले की खरेदी करत सुटतात. यामुळे आपला विनाकारण खर्च होऊ शकतो. 

* महागड्या वस्तूंची खरेदी
चांगल्या गुणवत्तेचे कपडे परिधान केल्याने आपण स्टायलिश दिसू असे बहुतांश पुरुष समजतात. मात्र हा फंडा प्रत्येकच वेळी कामाला येईल असे नाही. बऱ्याचदा आपण महागडा शर्ट खरेदी करतो आणि दोन-चार वेळा धुतल्यानंतर समजते की, त्याचा रंग फिका पडला. अशावेळी आपले पैसे वाया जातात.

* फॅशन आणि ट्रेंड्सच्या मागे धावणे
फॅशन एक अशी वस्तू आहे जी नेहमी बदलत असते. आज जी फॅशन मार्केटमध्ये सुरु आहे, ती उद्या बदलूही शकते. यासाठी फॅशनच्या मागे न धावता आपल्या गरजेनुसार कपडे खरेदी करावे. फॅशन आणि ट्रेंड्सच्या मागे धावून जर आपण आज महागडे कपडे खरेदी केले आणि काही दिवसानंतर फॅशनच बदलून गेली तर आपले पैसे वाया जाऊ शकतात.

* ब्रॅँडच्या मागे धावणे
रुबाब वाढविण्यासाठी बहुतेक पुरुष ब्रॅँडच्या मागे धावतात. यांची क्वालिटीतर चांगली असते, मात्र किंमत खूपच जास्त असते. प्रत्येकवेळी ब्रॅँडेड कपडे खरेदी करणेही शक्य नाही. अशावेळी थोडे संशोधन करुन बाचारातून चांगल्या क्वालिटीचे कपडे खरेदी करु न पैसे वाचवू शकता.

* चुकीच्या कपड्यांची निवड
काही प्रकारचे कपडे काही विशेष प्रसंगीच चांगले वाटतात. आणि आपण असे कपडे खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करतो. मात्र हे कपडे आपण पुन्हा कधी परिधान करु शकतो, हे माहित नसते. बऱ्याचदा असे कपडे आपल्या वार्डरोबमध्येच पडून राहतात. यासाठी कपड्यांची निवड नेहमी विचारपूर्वकच करावी.



Web Title: Fashion: You do not spend much money in trying to look stylish, do not you?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.