सौंदर्य खुलवण्यासाठी बर्फाचे 5 उपयुक्त फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 11:54 AM2017-07-24T11:54:28+5:302017-07-24T11:54:28+5:30

सौंदर्य खुलवायचे असेल आणि खर्चही अधिक नको असेल तर ""बर्फ"" हा तुमच्या खिशाला परवडणारा असा कमी खर्चिक उपाय आहे.

5 useful advantages of ice for beauty | सौंदर्य खुलवण्यासाठी बर्फाचे 5 उपयुक्त फायदे

सौंदर्य खुलवण्यासाठी बर्फाचे 5 उपयुक्त फायदे

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 -  सौंदर्य खुलवायचे असेल आणि खर्चही अधिक नको असेल तर ""बर्फ"" हा  तुमच्या खिशाला परवडणारा असा कमी खर्चिक उपाय आहे. घरातल्या घरात बर्फ सहज उपलब्धही होतो व सौंदर्याच्या बाबतीत बहुगुणकारीदेखील आहे.  पुरळ, मुरुमं, सनबर्न, त्वचेचा होणार दाह यावर बर्फ हा बहुगुणकारी उपाय आहे. चेह-यावर बर्फानं हलका मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. 
 
जाणून घेऊन बर्फाचे फायदे
1 . मुरुमं व चेह-याचा होणार दाह होतो कमी 
 
 चेह-यावरील मुरुमं करण्यासाठी बर्फाचा प्रामुख्यानं वापर केला जातो. बर्फामुळे चेह-यावरील लाल डाग, सूज व  वेदना कमी होण्यास मदत होते. मात्र, मुरुमांची स्थिती अति नाजूक असल्यास बर्फानं चेह-यावर मसाज करताना काळजी घ्यावी. 
 
चेहरा स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्या. त्यानंतर स्वच्छ कापडामध्ये बर्फ गुंडाळा. यानंतर ज्याठिकाणी मुरुमं आहेत तेथे 1 मिनिटपर्यंत बर्फ ठेवा. 5 मिनिटांची विश्रांती घ्या. त्यानंतर पुन्हा ज्याठिकाणी मुरुमं आहेत तेथे बर्फ धरवा.    
 
2. रक्ताभिसरण वाढते  
बर्फानं चेह-यावर हलकासा मसाज केल्यास रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते. यामुळे त्वजा उजळ होण्यासही मदत होते. 
 
एका स्वच्छ कापडामध्ये बर्फ घ्यावा. यानंतर डोळ्यांचा भाग सोडून चेहरा व मानेवर हलक्या हातानं मसाज करावा. जोर देऊन त्वचेवर बर्फ रगडू नये. 
 
3. सनबर्नवर बर्फ उत्तम उपाय
सनबर्नमुळे त्वचेचा पोत बिघडतो. पाण्यात कोरफडीचा रस मिसळून बर्फ तयार केल्यास सनबर्नचा त्रास कमी होण्यास मदत होते.  कोरफड नसल्यास पाण्यात काकडीच्या रसादेखील बर्फ तुम्ही बनवू शकता. चेहरा धुतल्यानंतर कापडामध्ये कोरफड किंवा काकडीचा रसानं तयार केलेला बर्फ गुंडाळा. व सनबर्न झालेल्या भागावर बर्फानं मसाज करावा. 
 
4. चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात
जसजसे वय वाढत जाते, तसतसे चेह-यावर सुरकुत्या वाढू लागतात. मात्र, चेह-यावर बर्फ चोळल्यास सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 
 
चेह-याला बर्फानं मसाज करण्यापूर्वी चेहरा कोमट/गरम पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्यावा. कापडात गुंडाळलेल्या बर्फ जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत चेह-यावर फिरवा. बर्फामुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी होण्यास नक्की मदत होईल. 
 
5. तेलकट त्वचेची कटकट होईल कमी
तेलकट त्वचेमुळे बरेच जण हैराण होतात. बर्फाच्या वापरामुळे चेह-यावर तयार होणारा तेलकट थर कमी होण्यास मदत होते. कापडात गुंडाळलेला बर्फ चेह-यावर चोळवा. यानंतर मॉइश्चरायझर लावावे. चेह-याचा दाह होत असल्यास त्यात पुदीन्याचा रसाचा वापर करावा. यामुळे चेह-याला थंडावा मिळेल. 
 

Web Title: 5 useful advantages of ice for beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.